भय मानवनिर्मित असते का ?- डॉ. हनुमंत भोपाळे

आयुष्यभर पळ काढण्याची वृत्ती माणसाला दुबळे बनवते. प्रतिकूल परिस्थिती,व्यक्ती, घटना, प्रसंग आणि वस्तू आपल्याला हाताळता येत नाही म्हणून त्यापासून दूर राहत गेलो तर त्या विषयीचे भय मनात कायम राहते.
हनुमंत भोपाळे
हनुमंत भोपाळे

नांदेड : अपयश आणि अपमानाच्या भीतीमुळे माणसांचा (Insalt and unsucsses) बहुतांश कल हा जबाबदारी टाळण्याकडे असतो. खरं तर जबाबदारी टाळणं म्हणजे सामर्थ्य त्यापासून वंचित होय. सामार्थ्याच्या अभावी मनुष्य आपल्या मनात भय निर्माण करतो. जितके भय अधिक तितकी दुर्बलता वाढत जाते. खरं तर जबाबदारी (Responsiblity) घेत गेलो, परिस्थितीचा सामना करत गेलो तर गैरसोय होईल पण सामर्थ्य वाढते. (Is fear man-made? - Dr. Hanumant Bhopale)

ज्यात काही गैरसोय होणार आहे, त्यापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न ही पळवाट आपल्याला आयुष्यभर पळवत राहते. आयुष्यभर पळ काढण्याची वृत्ती माणसाला दुबळे बनवते. प्रतिकूल परिस्थिती,व्यक्ती, घटना, प्रसंग आणि वस्तू आपल्याला हाताळता येत नाही म्हणून त्यापासून दूर राहत गेलो तर त्या विषयीचे भय मनात कायम राहते.

हेही वाचा - डेंगीमुळे चार वर्षात नांदेड जिल्ह्यात ९६७ जण बाधीत; काळजी घेण्याचे आवाहन- डॉ. आकाश देशमुख

ज्याचे भय वाटते, त्याला हाताळत गेलो तर नक्कीच हळूहळू भय कमी होते. समजा, एखाद्या व्यक्तीला पाण्यात पोहायचे भय वाटत असेल तर अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली कमरेपर्यंत पाण्यात पोहायला शिकायला हवे., मग कमरेला दुदग, कदू, किंवा हवा भरलेली ट्यूब बांधून पोहायला शिकले तर हळूहळू पाहायला, पाणी हाताळायला येते.

जी गोष्ट हाताळता येते तिचे भय वाटत नाही तर आनंद वाटतो. भय नावाचा प्रकार नसतो तर आपण नकारात्मक विचार करुन तो तयार करतो. जी गोष्ट माणूस तयार करतो ती नष्टही करु शकतो. यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव, ज्ञान, ध्यान, सराव सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचार आदी बाबी सहाय्यक ठरतात कृतीतून सामर्थ्य वाढते आणि सामर्थ्यापुढे भय राहतच नाही.

- डाॅ. हनुमंत भोपाळे यांच्या फेसबुक पेजवरुन साभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com