काय म्हणता ? शहरालगत गोदावरीचे 30 टक्के पाणी प्रदूषित

प्रल्हाद कांबळे | Saturday, 9 January 2021

सात जानेवारीला नांदेड गोदावरी नदी संस्थेच्यावतीने रिझाॅल्ट ऑक्सिजनचे पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण तपासण्यात आले. विष्णुपुरी येथील शंकर जलाशयातून आधी पाण्याचे नमुने घेण्यात आले

नांदेड : आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवलेले जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली येथे गोदावरी नदी संसद लोक चळवळ सुरु झाली आहे. या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी किटचा वापर करुन केलेल्या केमिकल टेस्टमध्ये नांदेड शहरालगत गोदावरी नदीतील 30 टक्के पाणी प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे.

सात जानेवारीला नांदेड गोदावरी नदी संस्थेच्यावतीने रिझाॅल्ट ऑक्सिजनचे पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण तपासण्यात आले. विष्णुपुरी येथील शंकर जलाशयातून आधी पाण्याचे नमुने घेण्यात आले. पाण्याचे नमुने दूषित नसल्याचे आढळून आले आहे. शंकर जलाशयातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण 9.0 पीपीएम ऑब्लिक एक एवढ्यावरुन आले. दरम्यान हीच नदी नांदेड शहरात येते. त्यावेळी नदीतील पाणी प्रदूषित होते असेही तपासणीत दिसून आले आहे. शहरालगत नदीतील पाण्यात रिझाॅल्ट ऑक्सिजनचे प्रमाण 6. 5 पीपीएम एवढे म्हणजेच जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला 30 टक्के पाणी प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात बिलोलीत २५ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह एकास अटक 

Advertising
Advertising

नांदेड शहरातील नागरिक वापरत असलेले रासायनिक साबण, टॉयलेट, क्लीनर डिटर्जंट यामुळे हे प्रदूषण झाल्याचे दिसून येते. शहरात कोणताही कारखाना नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीचे प्रदूषण झाल्याची बाब गंभीर मानले जाते. नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गोदावरी नदी संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. या चळवळीत नांदेडकर नागरिकांनी आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन गोदावरी नदी संसद अभियानाचे संयोजक दीपक मोरतळे यांनी केले आहे. या चळवळी डॉ. देशमुख, प्रा. परमेश्वर पवार, प्रा. डॉक्टर सुनंदा मोरे, प्रा. आनंद कृष्णापुरकर व इतरांचे सहकार्य मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा