जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मर्यादित साजरा होणार - पुरुषोत्तम खेडेकर 

file photo
file photo

नांदेड- कोरोना महामारी मुळे २०२१ चा १२ जानेवारी रोजी होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे अगदी मर्यादित स्वरूपात साजरा केला जाणार आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे.

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे दरवर्षी मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. लाखो जिजाऊ प्रेमीं या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होत असतात. यावर्षी हा उत्सव अगदी मर्यादित स्वरूपात साजरा केला जाणार आहे. मागील दहा महिन्यापासून जिजाऊजन्म स्थळ बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा परिसरात जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कलम १४४ लागू केले आहे. तसेच जमावबंदी आहे.

जिजाऊ सृष्टी येथे मुख्य कार्यक्रमात वीस प्रमुख पाहुणे व पदाधिकारी यांना उपस्थित राहता येईल असे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही स्टॉल्सना उदा- जेवण , पुस्तके , साहित्य, पेय , पाणी परवानगी दिली नाही. या परिस्थितीत जिजाऊ प्रेमींनी आपापल्या घरातच व गावातच शक्यतोवर कौटुंबिक पातळीवर जमेल तसा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करावा असे आवाहन शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. दरम्यान मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांनी हि जिजाऊ जन्मोत्सव आपापल्या घरी च साजरा करावा असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com