कैफी आजमी साहित्यनिष्ठ शायर - लक्ष्मीकांत देशमुख

file Photo
file Photo

नांदेड - एखाद्या शायर व्यक्तीची धर्मनिर्पेक्षता, मानवतावाद यावर किती श्रद्धा असावी हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. परंतु कैफी आजमींसाठी साहित्यनिष्ठा हिच जिवननिष्ठा होती. असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘कैफी आजमी’ यांच्याविषयी बोलताना भावना व्यक्त केली. 

नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व रुपवेध ग्रंथालयाच्या वतीने बुधवारी (ता. दहा) कुसुम सभागृहात नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याता म्हणून साहित्यिक श्री. देशमुख ‘कैफी आझमी - आयडिया आॅफ इंडियाचा प्रभावी भाष्यकार’ या विषयावर ते बोलत होते. श्री. देशमुख म्हणाले की, कैफी हे आपली जमीन सोडुन इतरांच्या न्याय हक्कासाठी जगणारे क्रांतीकारी शायर होते. कैफींनी केवळ समाजवादाचा पुरस्कारच केला नाही, तर रस्त्यावर उतरुन नारे दिले. 

ध्येयवेड्या क्रांतीकारकाची स्वप्ने बघणारे कैफी 

कैफी यांच्यावर घरापासून अन्याय झाला असे म्हटल्यास वावगे ठरु नये. त्यांच्या इतर भावंडांना इंग्रजीतून शिक्षण दिले मात्र त्याच्या वडीलांनी कैफी यांना मदरशातील शाळेत घातले. मात्र, कैफींनी मदरशातच संप घडवून आणला आणि तेव्हापासून कैफी हे खऱ्या अर्थाने कम्युनिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. हलाखीच्या परिस्थितीत देखील पक्षाकडुन मिळणाऱ्या अल्पशा मानधनावर ते जीवन व्यथीत करत होते. मात्र, त्यांची स्वप्ने ध्येय वेड्या क्रांतीकारकाची होती. त्यासाठी त्यांना देशातुन धर्म आणि जातींचे समुळ उच्चाटन करुन भेदभाव मुक्त भारत घडवायचा होता आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर आपली लेखणी झिजवल्याची आठवण श्री. देशमुख यांनी उपस्थितीतांना करुन दिली. 

नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेस यांची उपस्थिती होती

मागील काही काळापासून एकमेकापासून दुरावलेली माणसे नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेच्या निमित्ताने कैफी आझमी यांच्या जीवन कार्याविषयी भाष्यकार श्री. देशमुख यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकण्यासाठी सभागृहात एकत्र जमली होती. तत्पूर्वी डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी व्याख्याते लक्ष्मीकांत देशमुख यांचा परिचय करुन दिला. प्रा. विश्‍वाधार देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. या प्रसंगी प्रा. श्रीनिवास पांडे, दीपनाथ पत्की, श्‍यामल पत्की, मधुकर राहेगावकर, प्रा. बालाजी कोंपलवार, उत्तम सुर्यवंशी, शंतनु डोईफोडे, लक्ष्मण संगेवार, वसंत मैया आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com