नांदेडात जमिनींच्या किंमती गगनाला भिडल्या, सिमेंट - गजाळी दरवाढविरोधात क्रेडाईचे पंतप्रधानांकडे पत्रव्यवहार 

शिवचरण वावळे
Thursday, 11 February 2021

नांदेड उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही भागाचा झपाट्याने विस्तार होत आहे. दक्षिण भागात गोदावरी नदीपात्र असले, तरी नदी पलीकडे अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये होत असल्याने व शहराला लागुन असलेल्या लातूर फाटा, असर्जन, असदवन, विष्णुपूरी, कौठा, वाघीरोड या दक्षिण भागातील शेत, जमिनींचे व मोकळ्या भुखंडांचे दर पूर्वी पेक्षा ४० ते ५० टक्क्याने वाढले

नांदेड - कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनच्या काळात शहरातील रिकाम्या भुखंडांचे दर स्थिर होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्याने व जिल्ह्यास अशोक चव्हाण यांच्या रुपाने सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळताच नांदेड शहर आणि जिल्ह्यातील शेतीसह जमिनी व रिकाम्या भुखंडांच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ झाली आहे. अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे सर्वसामान्यांना घाम फुटला आहे तर सिमेंट आणि लोखंडाचे भाव वाढल्याने क्रेडाईच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यान पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

सध्या शहराचा नांदेड उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही भागाचा झपाट्याने विस्तार होत आहे. दक्षिण भागात गोदावरी नदीपात्र असले, तरी नदी पलीकडे अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये होत असल्याने व शहराला लागुन असलेल्या लातूर फाटा, असर्जन, असदवन, विष्णुपूरी, कौठा, वाघीरोड या दक्षिण भागातील शेत, जमिनींचे व मोकळ्या भुखंडांचे दर पूर्वी पेक्षा ४० ते ५० टक्क्याने वाढले आहेत. 

हेही वाचा- नांदेड : सात फेऱ्या घेण्याअगोदर गळ्यात पडली सरपंच पदाची माळ; आरळी येथील उच्चशिक्षित सरपंच तरुणीचा सोमवारी लग्न सोहळा

मोकळ्या भुखंडांच्या किंमतीमध्ये ३५ ते ४० टक्के वाढ

त्यापाठोपाठ नांदेड उत्तर भागातील वाडी परिसर, गुरुजी चौक, डी - मार्ट परिसर, निळा रोड, गजानन मंदीर, शिवरोड, आसना बायपास, विमानतळ परीसरातील मोकळ्या भुखंडांच्या किंमतीमध्ये ३५ ते ४० टक्के इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे लॉकडाउनदरम्यान सिमेंट आणि गजाळीचे दर वाढल्याने बांधकाम व्यवसायिकांनी बांधुन तयार असलेल्या घरांच्या किंमतीत देखील २० ते २५ टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे भविष्यात घर आणि जागेच्या किंमती अशाच वाढत राहिल्यास सर्वसामान्य नागरीकांचे स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार का? हा अनुत्तरीत प्रश्‍न आहे. 

हेही वाचा- नांदेड: प्रेमात अडथळा ठरणाऱ्याचा खून करणाऱ्या महिलेसह दोघांना जन्मठेप

सिमेंट - गजाळी वाढली

सिमेंट आणि गजाळीच्या दर प्रचंड वाढले आहेत. पूर्वी गजाळीचे दर साधारणात चार ते पाच हजार रुपयांपर्यंत असते आता हा दर सहा हजारापर्यंत गेला होता. सिमेंटचे दर देखील पूर्वी २५० रुपयापर्यंत असत आता हे दर साडेतीनशे रुपये इतके झाले आहेत. पूर्वी १५ लाखापर्यंत मिळणाऱ्या बाराशे स्क्वेअर फुट प्लॉटची किंमत आता २० लाख इतकी झाली आहे. 

दर कमी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार
लॉकडाउनंतर शहरातील प्लॉटिंगचे व शेतजमिनीचे दर वाढले आहेत. सोबत सिमेंट आणि गजाळीचे दर गगनाला भिडल्याने स्वःत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. क्रेडाईच्या वतीने देखील सिमेंट आणि गजाळीचे दर कमी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. 
- रवी कडगे, उपाध्यक्ष, क्रेडाई. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land prices skyrocketed in Nanded CREDAI's correspondence with the Prime Minister against the increase in the price of cement Nanded News