जीवंत वास्तव : चुलीतला विस्तव जिवंत राहावा म्हणून ती वाहून नेते काटेरी ठिणग्या

file photo
file photo

नांदेड : चुलीतला विस्तव जिवंत राहावा म्हणून ती वाहून नेते काटेरी ठिणग्या, करकचून बांधलेल्या त्यातली एक ठिणगी तरी जिवंतपणाची साक्ष म्हणून देत असेल का तिला आतून आवाज! या प्रा. जगदीश कदमांच्या कवितेच्या ओळीची आठवण करुन देते. वाढती महागाई आणि गॅसचा वाढलेला दर लक्षात घेता पुन्हा एकदा ग्रामिण भागातील गृहीणी चुलीकडे वळल्या आहेत. ग्रामिण भागात पायपीट करत महिलां कोसोदुर जाऊन सरपण जमा करुन त्या आफल्या डोक्यावरुन वाहुन नेत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यात व परिसरात वाढत्या शहराच्या विस्तारीकरणामुळे जंगल हळूहळू नष्ट होत चालले आहे. याचा फटका ग्रामीण भागातील तर काही शहरी भागातील वस्त्यांमध्ये चुलीवर स्वयंपाक करणाऱ्यांना बसत आहे. त्यांची चूल विझू नये म्हणून आजही काही महिला जंगलात जाऊन सरपण जमा करुन काटेरी ठिणग्या आपल्या डोक्यावरुन वाहताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला गॅस योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलाना गॅसचे कनेक्शन दिले. परंतु गॅसचे दर सध्या गगनाला भिडल्याने रिकामी झालेली सिलेंडर भरण्यापुरते ग्रहीणीचे बजेट नसल्याने त्या हतबल झाल्या आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी अखेर ग्रामीण भागात महिला व अनेक कुटुंब आहे पुन्हा चुलीकडे वळले आहेत. त्यांची चुल पेटली तरच त्यांच्या पोटाला भाकर मिळते म्हणून महिलांसह घरची सर्वच मंडळी सरपनासाठी धडपड करत असतात. त्या चुलीतील आग कायम रहावी यासाठी जंगलातून मिळेल ते काटेरी कुम्पण, लाकडी जमा करुन गृहिनी डोक्यावरून सरपण वाहताना दिसत आहेत.

महागाईचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना बसला असून पेट्रोल, डिझेल आणि गॅसची झळ शहरी भागातील नागरिकांनाही सोसावी लागत आहे. पुन्हा एकदा ग्रामीण भागातील महिला ह्या चुलीकडे वळल्या असून मात्र त्या चुलीला लागणारे सरपंच जमा करण्यासाठी त्यांना खूप दूर जंगलात जावे लागत आहे. वाढत्या विस्तारीकरणामुळे गाव शेजारील वृक्षांच्या कत्तली झाल्याने जंगलं ओसाड पडली आहेत. पायपीट करत पाच- सहा किलोमीटरवरुन चुली पेटविण्यासाठी सरपन जमा करणाऱ्या महिलांना मात्र चांगलीच कसरत करावी लागत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com