esakal | ‘या’ विद्यापीठात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

1508850407cover.jpg


शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था (ता.३१) ऑगस्टपर्यंत बंद राहतील. ऑनलाइन, दूरस्थ शिक्षणास परवानगी दिली जाईल आणि त्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यादरम्यान शिक्षक, संशोधक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडता घरी राहून आपले कामकाज करावे; तसेच कोणत्याही आवश्यक कामकाजाकरिता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या कर्मचारी यांची उपस्थिती १५ टक्के किंवा १५ कर्मचारी यापैकी जे अधिक असेल त्यांची उपस्थिती कार्यालयीन वेळेत अनिवार्य करण्यात आली आहे.

‘या’ विद्यापीठात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन

sakal_logo
By
श्याम जाधव

नवीन नांदेड ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने टाळेबंदीचा कालावधी वाढविल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परिसर, उपपरिसर, लातूर व परभणी, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली तसेच कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील सर्व संकुलांचे संचालक, प्रशासकीय विभागप्रमुख; तसेच संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य यांना नियम लागू असणार आहे.


शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था (ता.३१) ऑगस्टपर्यंत बंद राहतील. ऑनलाइन, दूरस्थ शिक्षणास परवानगी दिली जाईल आणि त्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यादरम्यान शिक्षक, संशोधक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडता घरी राहून आपले कामकाज करावे; तसेच कोणत्याही आवश्यक कामकाजाकरिता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या कर्मचारी यांची उपस्थिती १५ टक्के किंवा १५ कर्मचारी यापैकी जे अधिक असेल त्यांची उपस्थिती कार्यालयीन वेळेत अनिवार्य करण्यात आली आहे. संबंधित विभागाचे विभागप्रमुख यांनी आपल्या स्तरावर विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे नियोजन रोटेशन पद्धतीने, या व्यतिरिक्त कार्यालयात बोलविल्यास संबंधिताने त्वरित कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

हेही वाचा -  परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांचा चक्क पोलिसाकडून अपमान
 

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालय, विद्यापीठ परिसरासह उपपरिसर येथील प्राचार्य, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज शासन आदेशात दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया राबविणे, परीक्षेसह निकालाची कामे, ऑनलाइन क्लाससाठी पूर्वतयारी, विद्यार्थ्यांना ई-ग्रंथालयाची सुविधा पुरविणे, विद्यापीठ किंवा शासनाने निश्चित केल्लेल्या धोरणानुसार गुणात्मक रोजगाराभिमुख, समाजाभिमुख शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी आराखडा तयार करणे आणि यांसारखी विविध कामे महाविद्यालयात किंवा संकुलात प्रत्यक्ष उपस्थित न राहता निर्गमित केलेल्या सूचनेनुसार निर्धारित करण्यात आलेली कर्तव्य पूर्ण करावीत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून विद्यापीठास किंवा महाविद्यालयास आपल्या सेवा आवश्यक असल्यास संबंधितांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सेवांमध्ये योग्य नियोजन करावे
विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी वेळोवेळी जे निर्देश देतील त्याचे पालन करणे संबंधित जिल्ह्यातील विद्यापीठ उपपरिसर व सर्व महाविद्यालयांना बंधनकारक राहील; तसेच लॉकडाउनच्या कालावधीत कार्यालयामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांनी ‘आरोग्य सेतू अॅप’ वापरणे बंधनकारक असून, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुख, नियंत्रण अधिकारी यांची राहणार असून, अत्यावश्यक सेवा (आरोग्य केंद्र, सुरक्षा विभाग, स्थावर विभाग, पाणीपुरवठा, हाऊस कीपिंग, विद्युत पुरवठा) यांनी वरील बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून, सेवांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची दक्षता घेऊन आपल्या स्तरावर योग्य ते नियोजन करावे असे सांगितले.


विद्यापीठाचे संकेतस्थळ तपासावे
कार्यालयीन कामामध्ये व्यत्यय येणार नाही व कामे गतीने होण्याकरिता आवश्यक तेवढ्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना आपल्या स्तरावर बोलाविण्यात यावे. याशिवाय तातडीच्या प्रसंगी विद्यापीठ आणि उपपरिसरातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, याशिवाय अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शंब्दाकन - स्वप्निल गायकवाड

loading image