file photo
file photo

महाकृषि ऊर्जा अभियान, शाश्वत शेतीच्या स्वप्नपुर्तीचे अभियान- मुख्य अभियंता श्री पडळकर

नांदेड : महाकृषि  ऊर्जा अभियान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून वीज जोडणी धोरणा सोबतच अनेक वर्षापासून थकीत कृषिपंपाचे वीजबील कोरे करण्याची नामी संधी आहे. थकीत बिलापैकी ५० टक्के भरून उर्वरीत ५० टक्के रक्कम ही पुर्णपणे माफ होणार आहे. त्यामुळे हे केवळ अभियान नसुन शाश्वत शेतीची स्वप्नपुर्ती करणारे अभियान आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घेवून कृषिपंपाची थकबाकी कोरी करावी असे आवाहन मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

महाकृषि ऊर्जा अभियाना संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उमरी उपविभागातील शिंदी या गावात आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी सिंधी गावचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड, भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन गोपूलवाड, उपकार्यकारी अभियंता श्री बोडके, गोविंदराव पाटील सिंधीकर यांच्या प्रमूख उपस्थितीत बोलताना श्री पडळकर म्हणाले की, महा कृषी ऊर्जा अभियानात पाच वर्षापुर्वीच्या सर्व उच्च व लघुदाब कृषी पंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच पाच वर्षापर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार शंभर टक्के माफ करुन व्याज हे 18 टक्के ऐवजी त्या- त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याज दरानुसार आकारण्यात येत आहे. 

त्याच त्याचबरोबर वसूल झालेल्या बिलातील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत व ३३ टक्के रक्कम संबंधीत जिल्ह्यातील विद्युत यंत्रणांच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत आपली थकबाकी कोरी करावी. त्याचबरोबर शिंदी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या उद्देशाने सौर कृषि वीजवाहिनीसाठी ४० एकर गायरान जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल संरपंच श्री प्रभाकर पाटील पुयड यांच्यासह सर्व सदस्यांचे श्री पडळकर यांनी कौतूक करत आभार व्यक्त केले. याप्रसंगी मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी केलेल्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत ३३ शेतकऱ्यांनी चार लाख ९१ हजार रुपयांचा थकीत वीजबील भरणा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com