महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार निलंबित

अल्पावधीतच वादग्रस्त ठरलेले नायगाव येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार यांना अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी निलंबित केले आहे.
Nanded News
Nanded NewsGoogle

नायगाव (जि.नांदेड) : अल्पावधीतच वादग्रस्त ठरलेले नायगाव (Naigaon) येथील महावितरण कंपनीचे (Mahavitaran Company) उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार यांना अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी निलंबित केले आहे. त्यांच्यावर अनियमितता व गैरवर्तणूकीचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. निलंबनाच्या काळात कार्यकारी अभियंत्याच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याची तंबी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी निघालेले निलंबनाचे आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. नायगाव उपविभागाअंतर्गत उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असलेले अंकुश कौरवार हे अल्पावधीतच वादग्रस्त ठरले होते. कामाबाबत एखाद्या ग्राहकाने फोन केला कि त्याच्याशी अरेरावीची भाषा वापरून (Nanded) उद्धटपणे बोलत असत. ते माझे काम नव्हे असा दम भरायचे. पण काल त्यांच्या निलंबनाचे आदेश निघाल्यावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Nanded News
हिंगोली, कळंबमध्ये एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण; प्रवाशांचे हाल

यापुढे असेही आदेशित करण्यात आले की निलंबन कालावधीत त्यांना दर आठवड्याच्या सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ठीक १० वाजता कार्यकारी अभियंता नांदेड ग्रामीण यांच्या कार्यालयात उपस्थित राहून हजेरी द्यावी. सदर दिवशी कार्यालयास सुटी असेल तर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हजेरी द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com