महिला भजनी मंडळांना ‘या’ बॅंकेचा लाभ...कुठे ते वाचा.

सकाळ वृत्तसेवा | Saturday, 4 July 2020

शासकीय नियमानुसार पन्नास वर्षा झाले असे नागरिक प्रवास टाळण्याचे सांगितले आहे. या करिता नांदगाव बीओचे पोस्ट बँकेचे पोस्टमन संजय राठोड यांनी आपल्या गावात व परिसरात शेतात व घरोघरी जाऊन कोणत्याही बँक खात्यातील पैसे आधार कार्ड वर पोस्ट बँकेच्या मायक्रो आधार ATM द्वारे काढून दिले.

नांदेड : नांदगाव (ता. किनवट) येथील आषाढी एकादशी निमित्ताने गावातील महादेव मंदिरात भजन होते. या भजनासाठी गावातील वृद्ध महिला विठ्ठलाच्या भजनासाठी जमल्या होत्या. त्यातील महिलांना बाहेर गावी जाऊन बँकेतील पैसे काढणे शक्य नव्हते व शासकीय नियमानुसार पन्नास वर्षा झाले असे नागरिक प्रवास टाळण्याचे सांगितले आहे. या करिता नांदगाव बीओचे पोस्ट बँकेचे पोस्टमन संजय राठोड यांनी आपल्या गावात व परिसरात शेतात व घरोघरी जाऊन कोणत्याही बँक खात्यातील पैसे आधार कार्ड वर पोस्ट बँकेच्या मायक्रो आधार ATM द्वारे काढून दिले.

गावातील महादेव मंदिरात पोस्टमन यांनी जाऊन तेथे जमलेल्या महिला भाजनीना त्याचे आधार कार्ड व हाताचा आंगठा बायोमेट्रिक घेऊन Aeps द्वारे काढून देतात.
आजीबाईंना फोनमधून पैसे येत असल्याने लईच नवल झालं त्यातील एक आजी पोस्टमनला म्हणाली अर बापू मला बँकेतून पैसे निघतात ते माहीत होतं.
पण फोनमधून पैसे काडायचं सरकार नवीन काढलं बघ आमच् सारख्या म्हाताऱ्याची सोय केली मोदी न बघ. आमच्या काळात अस काही नव्हतं. आता सर्व बघायला मिळते.अशी आजी म्हणून मंदिरात गेली.

हेही वाचा -  नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लागले लक्ष

Advertising
Advertising

फळे व भाजीपाला विक्रीच्या दुकानदारानाही फायदा 

या लहान- लहान फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्याना बँकेत जाऊन रांगेत उभे राहणे व तासोनतास पैसे काढण्यासाठी वेळे जातो. एक दिवसाची मजुरी जाते धंदा होत नाही. यामुळे हातावरील पोट भरणाऱ्या बँकेतील पैसे काढणे शक्य नाही.

मोफत बँकेतील पैसे काढून देत आहेत

गोरगरीब व लहान मुलांना व्यवसाय भाजीपाला, फळे, लोणचे विक्री, पापड विक्री, फुले विक्री, खरमुरे बटाणे विक्री, भोईमुग शेंगा विक्री गाडीवाले, मका कणसे विक्रीवाले यांच्या दुकानात व दारात जाऊन पोस्ट बँकेचे पोस्टमन रवी वाडीकर यांनी कोणत्याही बँकेतील खात्यावरील पैसे पोस्ट बँकेच्या मायक्रो आधार ATM द्वारे कोणतेही पैसे न घेता मोफत बँकेतील पैसे काढून देत आहेत.

पोस्ट बँक ही गावा गावात नागरिकांची जीवनवाहिनी

पोस्ट बँकेच्या घरपोच सेवेमुळे व्यवसाय तेजीत चालत आहे. कोणत्याही बँकेतील सर्व आर्थिक व्यवहार दुकानात बसून होत आहेत यामुळे दुकानदराचा वेळ वाचला व धंदा बुडत नसल्याने पोस्ट बँक फायदेशीर ठरत आहे. अनेक वर्षांपासून नागरिकाच्या गंभीर समस्या बँकेबद्दल होत्या त्या सर्व समस्या पोस्ट बँकेमुळे सुटल्या असल्याचे व्यापारी वर्गाकडून चर्चा होत आसल्याची एकवण्यास मिळत आहे.
पोस्ट बँक ही गावा गावात नागरिकांची जीवनवाहिनी बनली आहे.