Mahur: नगर पंचायतीचे बिगुल वाजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहूर नगर पंचायत
नगर पंचायतीचे बिगुल वाजले

माहूर : नगर पंचायतीचे बिगुल वाजले

माहूर : राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या नगर परिषद, नगरपंचायतच्या प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील माहूर व अर्धापूर नगर पंचायतीचा समावेश आहे. नगर पंचायत निवडणूक येत्या डिसेंबर - जानेवारी महिन्यात संपन्न होण्याची शक्यता आहे. राज्यातील डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १७, मुदत समाप्त झालेल्या २ व ७ नवनिर्मित अशा २६ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (ता.नऊ) रोजी जाहीर केला.

त्या नुसार (ता.११) नोव्हेंबर पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव, नगर पंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे, (ता.११) नोव्हेंबर प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे, सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करणे जिल्हाधिकारी व नगरपंचायतीच्या वेबसाईटसह, नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढणे.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

(ता.१२) रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व गमधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला, (ता.१२) रोजी प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरिता वृत्तपत्रात व स्थानिकपातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे, (ता.१२) रोजीच हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी, (ता.१७) रोजी प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे, (ता.१८) रोजी हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठविणे, (ता.२२) रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे. असा कार्यक्रम, अधिनियमातील कलम १० नुसार अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी (ता.२३) नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात व स्थानिकपातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्या स्वाक्षरीने जाहीर केला आहे.

loading image
go to top