
Mahurgad Sky Walk : आता लिफ्टने जा माहुरगडावर!
माहूर (जि. नांदेड) - माहूर गडावर वसलेल्या रेणुका माता मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी २४० पायऱ्या चढाव्या लागत होत्या. पण, आता भाविकांना स्काय वॉक आणि लिफ्टने थेट मंदिरात जाता येणार आहे. यासाठी ५१.३ कोटी रुपये खर्चाच्या स्काय वॉक (लिफ्टसह) प्रकल्पाचे शनिवारी भूमिपूजन झाले.
कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष नागेश न्हावकर, खासदार हेमंत पाटील, किनवटचे आमदार भीमराव केराम, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘‘या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून, व्यापार वाढणार आहे. स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील’’, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला. नांदेड जिल्ह्यासाठी एक हजार ७६५ कोटी रुपयांचे आणि १५७.२२ किलोमीटर लांबीचे नवीन प्रकल्प जाहीर करत असल्याची घोषणादेखील त्यांनी केली.
प्रकल्पाची गरज
सध्या भाविकांना २४० पायऱ्या चढाव्या लागतात
स्कायवॉक तयार झाल्यानंतर सुलभपण
यामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांगांची गैरसोय टळणार
मंदिरात जाण्यासाठी चार कॅप्सूल लिफ्ट तयार करणार
टेकडीच्या पायथ्याशी लिफ्ट स्थानक
एकावेळी एका लिफ्टमध्ये २० भाविकांचा समावेश
चार लिफ्टमधून एकावेळी एकूण ८० भाविक ये-जा करू शकतात