esakal | "माझं गाव- सुंदर गाव" या कृती कार्यक्रमाला मराठवाड्याची सुरुवात नांदेडच्या मुगटमधून
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आपलं गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य; उपायुक्त सुरेश वेदमुथा 

"माझं गाव- सुंदर गाव" या कृती कार्यक्रमाला मराठवाड्याची सुरुवात नांदेडच्या मुगटमधून

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड  (जिल्हा नांदेड) : आपलं गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून शासनाने तुमच्यासाठी आणलेल्या शौचालयाचा लाभ घेऊन त्याचा वापर करावा बांधकाम करुन बंद ठेवू नये. आपल्या घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनास मदत करावी, जेणेकरून "माझं गाव- सुंदर गाव" या उपक्रमास तुमची साथ मिळेल व हा उपक्रम यशस्वी ठरेल असे आवाहन औरंगाबाद विभागाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी मुगट (ता. मुदखेड) येथे या उपक्रमाचा औरंगाबाद विभागातून शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

मुगट (ता. मुदखेड) "माझे गाव सुंदर गाव" या कृती कार्यक्रमाला औरंगाबाद विभागातून मुगट या गावापासून विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या विविध अभियाना मधील एक "माझं गाव सुंदर गाव" २०२१ या अभियानाला विभागीय स्तरावर सुरुवात करण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद विभागातील  मुगट ता. मुदखेड या गावापासून हा कृती कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला औरंगाबाद महसूल विभागाचे उपायुक्त सुरेश वेदमुथा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सहाय्यक आयुक्त औरंगाबाद वैशाली रसाळ, नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर ठोंबरे, उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र खंदारे, कृषी संवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, सभाापती नाईकसाहेब, जिल्हा परिषद सदस्या अरुणा कल्याणे यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प. पु. श्री. श्री. रविशंकरजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुगट ग्रामपंचायतच्या वतीने प्रशासक कैलास गायकवाड यांनी प्रास्ताविक मांडले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

यावेळी मान्यवर मंडळींनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व व शौचालयाचे महत्त्व पटवून सांगितले. तरुण पिढी हि व्यसनाधीन ते कडे वळत आहे त्याविषयी आपले मत मांडत चिंता व्यक्त केली. बेटी बचावो, बेटी पढावो या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लावली जाणार आहे. व भविष्यामध्ये मुगट ता. मुदखेड येथून स्मार्ट व हुशार मुली म्हणून बाहेर येतील अशी आशा यावेळी वर्षा घुगे यांनी व्यक्त केली. शौचालय बांधून कामाची नाही तर त्याचा वापर आपण नियमीत केला पाहिजे. नाहीतर आपल्याच घरच्या स्त्रिया बाहेर बसल्यावर जेवढा स्त्रियांचा अपमान होतो त्याला पुरुष देखील मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. प्रत्येकाला आपले घर, कुटुंब निरोगी रहावे असे वाटत असेल तर शौचालयाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावात घाण होणार नाही व रोगराई निर्माण होणार नाही. तसेच सांडपाण्यासाठी शोषखड्डे तयार करा व आपले गाव सांडपाणी मुक्त गाव करा. प्रत्येक घरासमोर शोषखड्डा तयार करण्याचा  प्रयत्न करा. आम्ही येतो व तुम्हाला सांगून जातो परंतु ही जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व गावकऱ्यांनी मिळून ही जबाबदारी घेतली पाहिजे तरच "आपले गाव सुंदर गाव" होईल असे मत जिल्हाधिकारी डाॅ. विपिन ईटनकर यांनी व्यक्त केले.

यावेळी आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले होते, पाणी पुरवठा विभाग नांदेड इतर विभागाची स्टॉल याठिकाणी लावण्यात आली होती. या स्टॉल्सना उपस्थित मान्यवरांनी भेटी देऊन पाहणी केली.

या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रशांत दिग्रसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार संजय नागमवाड, जेथेदार तेजसिंग महाराज, मोती गिरी महाराज अशोक महाराज, माजी सभापती शोभाताई मुंगल, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, मंडळ अधिकारी, गावातील महिला, पुरुष उपस्थित होते. 

संपादन- प्रल्हाद कांबळे