मास्क गेला अन् डोक्यावर हेल्मेट आलं

नांदेडकरांमध्ये संभ्रमावस्था : स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यकच
mask free but helmet compulsion action Vipin Itankar nanded
mask free but helmet compulsion action Vipin Itankar nandedsakal

नांदेड : जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी हेल्मेट सक्तीसंदर्भातील आदेश बुधवारी (ता.३०) जारी केला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून म्हणजे शुक्रवारी (ता.एक) सुरु झाली आहे. त्यामुळे नांदेडकरांची अवस्था मास्क तोंडावरून गेला आणि डोक्यावर हेल्मेट आलं अशी झाल्याच्या प्रतिक्रिया शुक्रवारी ऐकायला मिळाल्या.

राज्यसरकारने आजपासून नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य सरकारने मास्कचा वापर ऐच्छिक केला आहे. मात्र, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी बुधवारी नांदेड जिल्ह्यात हेल्मेट सक्तीसंदर्भातील आदेश जारी केला आहे. त्यामुळे नांदेडकरांची अवस्था मास्क तोंडावरून गेला आणि डोक्यावर हेल्मेट आलं अशी झाली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, महाविद्यालयात व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे.

हेल्मेटचे फायदे

  • डोळ्यात कचरा, नाका तोंडात धूळ जात नाही.

  • चेहरा, डोके सुरक्षित राहते.

  • अपघात झाला तरीही जोरात मार लागत नाही.

  • डोक्याला गंभीर इजा होत नाही.

  • सुरक्षित प्रवास होण्यास मदत.

वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकांच्या तुलनेत दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका हा सातपट असतो. त्यामुळे दुचाकी चालकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा.

- सदाशिवराप म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com