
लॉकडाउनच्या काळात आठ हजार आठशे गरजू महिलांपर्यंत घरपोच मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणाऱ्या शुभंकरोति फाउंडेशनने मास्कनिर्मितीतूनही महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.
मास्कनिर्मितीतून गरजू महिलांना मिळतोय रोजगार, कसा? ते वाचाच
नांदेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रोजगार आणि व्यवसायासंबंधी आज प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र महिलांची मासिक पाळीतील गरज ओळखून लॉकडाउनच्या काळात आठ हजार आठशे गरजू महिलांपर्यंत घरपोच मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणाऱ्या शुभंकरोति फाउंडेशनने मास्कनिर्मितीतूनही महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.
दोन महिन्यांपासून शुभंकरोति फाउंडेशनच्या वतीने निर्जंतुकीकरण केलेल्या मास्कची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आज ३० महिला मास्क निर्मितीचे काम करीत असून दररोज जवळपास दीड हजार मास्कची निर्मिती होत आहे. शाळा, महाविद्यालय, खाणावळ, खासगी शिकवणी बंद असताना मागील चार महिन्यांपासून मासिक उत्पन्न बंद असलेल्या महिलांना कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी संस्थेचा निर्जंतुकीकरण केलेल्या मास्क निर्मिती हा उपक्रम आर्थिक आधार देण्याचे काम करीत आहे.
हे देखील वाचा - Independence day- देशासाठी प्रत्येक नागरिकांनी कटिबद्ध होऊन आपले योगदान देण्याची अत्यावश्यकता- पालकमंत्री अशोक चव्हाण
आपल्या सर्वांना माहिती आहे, की कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी बऱ्याच सामाजिक संस्था आणि खासगी संस्था मास्क बनवत आहेत; परंतु आरोग्याची काळजी म्हणून स्वच्छतेच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा आपण मास्क खरेदी करतो किंवा वितरित करतो तेव्हा आपणास मास्कच्या सुरक्षिततेविषयी सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे.
पॅकिंगसाठी होतो कागदी पाकिटाचा वापर
सुरक्षिततेच्या गरजा लक्षात घेऊन शुभंकरोति फाउंडेशनने हजारो लोकांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी ‘यूव्ही निर्जंतुकीकरण पुन्हा वापरण्यायोग्य कपड्याचे मास्क’ निर्मितीचे काम सुरू केले आहे. यातून महिलांना रोजगाराचीही संधी दिली आहे. प्रत्येक महिला या उपजीविकेच्या संधीतून दररोज २५० ते ३०० रुपये कमवत आहेत. शिवाय अनेक महिलांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. कागदाच्या वापरामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही, असे शासनाने निर्गमित केल्यामुळे मास्क पॅकिंगसाठी कागदी पाकिटाचा वापर केला जात आहे.
हेही वाचलेच पाहिजे - कोरोना ब्रेकिंग : 87 व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी, 196 बाधितांची भर तर चोघांचा मृत्यू
महिलांना मिळाला रोजगार
आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत शुभंकरोति फाउंडेशनने नांदेड जिल्ह्यातील २० हजार गरीब व गरजू लोकांना मोफत यूव्ही निर्जंतुकीकरण कपड्यांचा मास्क प्रदान करीत आहे; तसेच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून दहा रुपये आणि बारा रुपये अशा अल्पदरात ‘यूव्ही निर्जंतुकीकरण पुन्हा वापरण्यायोग्य कपड्याचे मास्क’ नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महिलांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमामुळे कोरोना महामारीमध्ये ज्यांची नोकरी गेली आहे, अशा कुटुंबातील महिलांना रोजगार मिळाला आहे.
Web Title: Mask Making Provides Employment Needy Women Nanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..