माता साहेबदेवाजी जन्मोत्सवाची सांगता भक्तिभावाने 

file photo
file photo

नांदेड : गुरुद्वारा माता साहेब (मुगट परिसर) येथे मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या माता साहेब देवाजी यांच्या 339 व्या जन्मोत्सवाची सांगता बुधवारी दुपारी भक्तिभावाने करण्यात आली. या वेळी गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी, मीतग्रंथी भाई गुरमीतसिंघजी, पंजप्यारे भाई जगिंदरसिंघजी, ज्ञानी भाई अवतारसिंघजी शीतल, कथाकार ज्ञानी विजयेंद्रसिंघजी, गुरुद्वारा लंगरसाहेबचे संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा गुरदेवसिंघजी, संतबाबा तेजासिंघजी मातासाहेबवाले आणि विविध दलांचे प्रमुख जत्थेदार उपस्थित होते. जन्मोत्सवाची सुरुवात ता. 26 रोजी झाली होती. 

बुधवारी सकाळी श्री गुरु ग्रंथसाहेबांचे पठन करण्यात आले. नंतर कथा आणि कीर्तन दरबार कार्यक्रम पार पडले. सहायक जत्थेदार संत बाबा रामसिंघजी यांनी या वेळी माता साहेब देवाजी विषयी आपले मत मांडले. गुरुद्वारा मातासाहेब हे स्थान पवित्र पावन असून येथे सतयुगात माताजी यांनी तपस्या केली होती. खालसा पंताची माता म्हणून त्यांना आपण आदराने संबोधतो असे ही ते म्हणाले. संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी ही प्रसंगी उपस्थित भाविकांसमोर आपले विचार  मांडले. 

यावेळी भाविकांची उपस्थिती होती

संतबाबा तेजासिंघजी यांनी जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारेसाहिबान यांचे सत्कार केले. तर पंजप्यारेसाहिबान यांनी दस्तार, चोला आणि सिरेपाव देऊन संतबाबा तेजासिंघजी यांना आशीर्वाद दिले. रागी भाई जगतेश्वरसिंघ पटियालावाले रागी जत्था, रागी भाई जीवन सिंघजी आणि रागी जत्था भाई सुखदेवसिंघजी यांचे कीर्तन झाले. पश्च्यात सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांनी जन्मोत्सव कार्यक्रम समापनाची अरदास केली. नंतर लंगर प्रसाद कार्यक्रम, नगरकीर्तन आणि नेजाबाजीचे प्रत्यक्षिक इत्यादि कार्यक्रम पार पडले. या वेळी भाविकांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com