esakal | फत्तेपूरची शाळा पाहून भारावले नांदेड दक्षिणचे आमदार 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

दसऱ्यानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर सजवला होता. यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांनी या शाळेला अचानक भेटी दिली असतानाही विद्यार्थिनींनी गेटवर त्यांचे औक्षण करून आमची शाळा संस्कृतीचीही जोपासना करते हे दाखवून दिले. 

फत्तेपूरची शाळा पाहून भारावले नांदेड दक्षिणचे आमदार 

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : दसऱ्यानिमित्त रविवार असतानाही फत्तेपूर येथील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सजावट करून दसऱ्याचा सण साजरा केला. विशेष म्हणजे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी शाळेला अचानक भेट दिली असता शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह बघून भारावून गेले. 

उपक्रमशील शिक्षक बशीर पठाण यांनी स्वखर्चातून तसेच लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी करून भिंती बोलक्या केल्या आहेत. शिवाय शाळेच्या परिसरामध्ये विविधप्रकारची झाडी लावल्यामुळे शाळेचा परिसर हिरवागार दिसत आहे. विद्यार्थ्यांना फक्त अध्यापनच नको, तर त्यांचे मन शाळेमध्ये रमावे, अभ्यास करण्याचा उत्साह निर्माण व्हावा म्हणून सर्वच शिक्षक प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये त्यांना यशदेखील येत आहे. 

हेही वाचा - हल्लाबोल मिरवणूक : सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

याप्रसंगी शाळा आणि परिसर बघून आमदार हंबर्डे भारावून गेले. शाळेसाठी काहीही साहित्य लागल्यास किंवा अडचण असल्यास मला तुम्ही सांगावी, या अडचणी सोडविण्याचा मी प्रयत्न करेन असे आश्वासनही आमदार हंबर्डे यांनी शिक्षकांसह ग्रामस्थांना दिले. सरपंच गणपतराव श्यामराव, मोतीराम नागोजी संगेकर, संभाजी देटवे उपसरपंच, राजेश मुकींद ढगे, रघुनाथ अप्पा, मारोतराव संगेकर, शंकर तोकलवाड, मारोतराव लोटके, अनिल पाईकराव आदी उपस्थित होते. 

हे देखील वाचाच - कोरोना व ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे, श्री रेणुका मातेला साकडे
  
कोरोना काळातही आॅफलाईन शिक्षण
ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून फत्तेपूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आॅफलाईन शिक्षण दिले. विशेष म्हणजे या शाळेची दखल विरिष्ठांनीही घेतली होती. मात्र काही अकर्मण्यवादींनी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही निर्माणाचं काम करीत आहात, काही झालं तर आधी मी सामोरा जाईन, हा विश्वास शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी शिक्षकांना दिला.  सध्याच्या काळात चांगलं काम करणाऱ्यांना अडचणीत आणणारे, तेही जवळचेच, हे खूप झालेत, हे दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे या शाळेला गावाने जीव लावलेला आहे.  

येथे क्लिक कराच - नांदेड - ९५ टके रुग्णांनी केली कोरोनावर मात, रविवारी १२४ रुग्ण कोरोनामुक्त, १०१ पॉझिटिव्ह एकाचा

माळरानावर फुलवले शैक्षणिक नंदनवन 
शाळेत दसरा साजरा करण्याची मुख्याध्यापक बशीर पठाण यांची कल्पना आणि त्यांचा प्रत्येक उपक्रमातील जीव लावून घेतलेला पुढाकार हा माझ्या प्रशासकीय कार्यकाळातील अविस्मरणीय अनुभव आहे. सहकारी शिक्षिका सपना शिंदे यांचे कामही कौतुकास्पद आहे. या शिक्षकांनी एका उजाड माळरानावर शैक्षणिक नंदनवन फुलवले आहे. 
- व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी 

loading image
go to top