नांदेडमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांशी आमदाराने साधला संवाद 

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य चांगले राहावे, यासाठी नागरीक पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. या नागरिकांशी आमदार बालाजी कल्याणकर यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्याबरोबरच या काळात विना मास्क कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले  

कोरोनाविरुद्ध लढायचे तर आपली रोगप्रतिकार शक्ती टिकून ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये विविध आजारांची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत. या आजारांना दूर ठेवण्यासाठी मॉर्निंग वॉक करणे हा सोपा पर्याय असल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. शहरातील मालेगाव रोड, विमानतळ रोड, पूर्णा रोड त्याबरोबरच महाविद्यालयीन परिसर व्हीआयपी रोड, रेल्वे स्टेशन रोड आदी रस्त्यांवर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या दिसून येत आहे. आमदार बालाजी कल्याणकर गुरुवारी (ता. २२) सकाळी मुंबईहून नांदेडला पोहचले. शहरात येताच मालेगाव रोड, तरोडा खर्द व बुद्रुक त्याबरोबरच विमानतळ परिसर, राज कॉर्नर, तरोडानाका या परिसरात जाऊन मॉर्निंग वॉक  करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.   

पोलिस गस्त वाढवण्याची महिलांची मागणी

दरम्यान विना मास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना मास्कचा वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.  तसेच महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मालेगाव रोड, तरोडा खुर्द व बुद्रुक तसेच इतर भागातही रात्री व सकाळच्या सुमारास पोलिसांची गस्त वाढवावी, कचरा, पथदिवे बसवण्याची मागणी आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडे केली. आमदार कल्याणकर यांनी या बाबत तत्काळ पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून गस्त वाढवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.  

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व ग्रामीण भागामध्ये या अभियानाची सुरुवात झाली आहे. वैद्यकिय विभागाच्या वतीने या घरोघर जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांना देखील याचे महत्व नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर सांगत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com