राज्यातील जिल्हा न्यायालयात मोक्का खटला चालणार- उच्च न्यायालय

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात दाखल झालेल्या महाराष्ट्र सामुहीक गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत दाखल झालेल खटले मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथेच चालत होते. त्यामुळे अनेक खटल्याचा निकाल येण्यास वेळ लागत असून या गंभीर गुन्ह्यातील आरोपींची ने-आण करण्यासाठी पोलिस विभागावर मोठी जबाबदारी होती. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश हा खटला चालविणार आहेत. 

जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्हा न्यायाधीशांना मोक्का खटला चालविण्याचा अधिकार देण्यात आले आहे. मराठवाड्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चा खटला औरंगाबाद येथील मोक्का न्यायालयात चालत होता. पण आता प्रत्येक जिल्ह्यातील सत्र विभागांमध्ये नेमणुकीस असलेल्या जिल्हा न्यायाधीशांना हा खटला चालविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा न्यायाधीश (पहिले), जिल्हा न्यायाधीश (दुसरे) यांच्यासह भोकर, कंधार आणि बिलोली अशा जिल्हा न्यायालयाला हे अधिकार प्राप्त झाले आहेत. लीगल ॲडव्हायझर तथा सहसचिव उदय शुक्ला यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या एका पत्रानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्काचे खटले मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तीनी आता प्रत्येक जिल्ह्यात सत्र विभागात काम करणारे जिल्हा न्यायाधीश (पहिले) आणि जिल्हा न्यायाधीश (दुसरे) यांनी चालवावे तसे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा -  दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
 
मराठवाड्यात मोक्का न्यायालय फक्त औरंगाबाद येथे होते

आज पर्यंत मराठवाड्यात मोक्का न्यायालय फक्त औरंगाबाद येथे होते. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील मोक्का खटले औरंगाबादच्या मोक्का न्यायालयात चालवले जातात. पण आता या आदेशान्वये हे खटले प्रत्येक जिल्ह्यातील सत्र विभागाच्या जिल्हा न्यायाधीशांना चालविण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कंधार, भोकर, नांदेड, बिलोली असे चार सत्र विभाग आहेत. त्यानुसार नांदेड येथील जिल्हा न्यायाधीश (पहिले) जिल्हा न्यायाधीश (दुसरे) तसेच भोकर, कंधार आणि बिलोली येथील जिल्हा न्यायाधीशांना मोक्का खटले चालविण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे. या आदेशाची माहिती ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्र, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रबंधक, पोलीस महासंचालक महाराष्ट्र, सर्व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा सरकारी अभियोक्ता, गृह मंत्रालय आणि इतर संबंधितांना पाठविण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com