नांदेड जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; ११५ जण पाझिटिव्ह

शिवचरण वावळे | Thursday, 20 August 2020

नांदेड : गुरुवारी (ता.१९) प्राप्त झालेल्या अहवालात २३० जण कोरोना बाधित आढळुन आले होते. तर सहा जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गुरूवारी (ता.२०) ७३८ स्वॅब अहवाल प्राप्त झाले यातील ५५७ निगेटिव्ह तर ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले दुसरीकडे १०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

गुरुवारी शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील दोन, जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर-१८, मुदखेड कोविड केअर सेंचर-११, बिलोली कोविड केअर सेंटर - ११, किनवट कोविड केअर सेंटर - पाच, भोकर कोविड केअर सेंटर- तीन, मुखेड कोविड केअर सेंटर - ३४, उमरी कोविड केअर सेंटर- तीन, पंजाब भवन कोविड केअर सेंटर - चार व धर्माबाद कोविड केअर सेंटर १२ अशा एकुण १०३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन हजार ८०३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

हेही वाचा-

५५ वर्ष वयाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू

बुधवारी आरटीपीसीआर व अँन्टीजेन टेस्ट किटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणीत ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधीत रुग्णसंख्या चार हजार ६७० वर गेली आहे. तर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या किल्ला रोड नांदेड येथील एका ५५ वर्ष वयाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या १६० वर पोहचली आहे. 

हेही वाचा- राज्यातील २३६ महिला चालकांना कामावर परतण्याची आस ​

१७० बाधितांची प्रकृती चिंताजनक 

नांदेड शहर- ३६ 
नांदेड ग्रामीण- तीन 
अर्धापूर- एक 
हदगाव-तीन 
कंधार-चार 
मुखेड-एक 
धर्माबाद- २५ 
मुंबई-एक 
परभणी-एक 
बिलोली- १५ 
देगलूर-एक 
किनवट-सात 
मुदखेड-तीन 
यवतमाळ-दोन 
हिंगोली- चार 
भोकर- एक 
नायगाव-सहा 
लोहा- एक 
अशा एकुण ११५ रुग्णांचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. उपचार सुरु असलेल्या कोरोना बाधिक रुग्णांपैकी १७० बाधितांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. 

कोरोना मीटर- 
आज ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 
आज १०३ रुग्णांनी कोरोनावर मात 
एकुण बाधीत रुग्णसंख्या चार हजार ६७० 
आत्तापर्यंत कोरोना मुक्त रुग्ण दोन हजार ८०३