esakal | कोरोना काळात हत्तीरोग विभाग बिनधास्त
sakal

बोलून बातमी शोधा

masquto.jpg


तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणा राबविली जाते. ग्रामीण भागातही याचे जाळे पसरलेले आहे. या शिवाय आरोग्य विभागाशी निगडित असलेले हत्तीरोग कार्यालय मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. पायाला होणारा (हत्तीपाय आजार) एक विशिष्ट डास दंश केल्याने होतो. विशेष म्हणजे सदरील आजाराची होणारी लक्षणे जर तपासणी करावयाची असेल तर रात्रीला रक्त तपासणी करावी लागते.

कोरोना काळात हत्तीरोग विभाग बिनधास्त

sakal_logo
By
बाबूराव पाटील


भोकर, (जि. नांदेड) ः शहर आणि तालुक्यात हत्तीरोग विभाग प्रभावीपणे काम करित नसल्याने डासांपासून होणारे विविध आजार बळावत आहेत. कोविडच्या कामात कर्मचारी गुंतल्याने या कामाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. सखल भागात पाणी साचल्याने शहरात डासाचे साम्राज्य वाढले असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबधीत विभाग बिनधास्त असल्याने आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे. 

तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणा राबविली जाते. ग्रामीण भागातही याचे जाळे पसरलेले आहे. या शिवाय आरोग्य विभागाशी निगडित असलेले हत्तीरोग कार्यालय मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. पायाला होणारा (हत्तीपाय आजार) एक विशिष्ट डास दंश केल्याने होतो. विशेष म्हणजे सदरील आजाराची होणारी लक्षणे जर तपासणी करावयाची असेल तर रात्रीला रक्त तपासणी करावी लागते. तशा पध्दतीने सदरील विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या परीसरात काम करतात. शहरात एका कोपऱ्यात या विभागाचे कार्यालय असून नेहमीच रिकामे असते. आमचे फक्त रात्रीला कामे असल्याने दिवसा कार्यालयात काम असेल तरच येतो असे सांगून मोकळे होतात. 

हेही वाचा -  नांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष
 


अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अंकुश राहत नाही. सर्व कारभार रामभरोसे सुरू आहे. सध्या पाऊस मनसोक्त बरसत असल्याने चोहिकडे पाणीच पाणी झाले आहे. विशेषतः सखल भागात पाणी साचल्याने त्यात डासांचे प्रमाण वाढत आहे. सध्या जनतेला कोरोना विषाणूंमुळे सळो की पळो करून सोडले आहे. अद्याप यावर लस निघाली नसल्याने कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. यातून आता कसेबसे सावरत असताना शहर आणि तालुक्यात डासांची उत्पत्ती वाढत आहे. या डासांमुळे मलेरिया, डेंग्यूताप, चिकण गोणीया असे विविध आजार होत आहेत. डासांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र हत्तीरोग विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येथील अधिकारी फारसे याकडे गांभीर्याने बघत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

अधिकारी मात्र बिनधास्त
तालुक्यात सखल भागात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. यावर आळा घालण्यासाठी जर गप्पीमासे या पाण्यात सोडले तर ऊत्पती होत नाही. कारण डास जेंव्हा पाण्यात असंख्य अंडी घालतात ते अंडे हे गप्पीमासे फस्त करतात. अंडे हे माशाचे आवडते खाद्य आहे. गप्पीमासे व फवारणीअभावी शहरात डासांनी धूमाकूळ घातला आहे. अधिकारी मात्र बिनधास्त असल्याने आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे. 

कर्मचारी कोवीड कामात गुंतल्याने अडचण 
तालुक्यात गप्पीमासे उपलब्ध असून कमतरता भासली तर मागणी करताच पूरवठा केला जातो. वाहत्या पाण्यात मासे सोडता येत नाही. डबक्यात, हौदात, सखल भागातील पाण्यात सोडले जाते व फवारणी करावी लागते. या मुळे डासांची उत्पत्ती होत नाही. आमचे कर्मचारी कोवीड कामात गुंतल्याने अडचण होत आहे. जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे पुलकंठवार, आरोग्य सहायक हत्तीरोग विभाग भोकर यांनी सांगितले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

loading image