महाआघाडीतील खासदार व आमदारामध्ये पाण्यावरुन कलगीतुरा, कुठे ते वाचा...? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

त्यांनी या प्रकरणी माझ्या मतदार संघात लुडबूड करु नका असा उलट सवाल खासदार हेमंत पाटील यांना दिली आहे. ही मागणी मी मागच्‍या महिम्यातच केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या खासदार व आमदार यांच्या राजकिय वादाच्या चर्चेचा पूर आला आहे.

महाआघाडीतील खासदार व आमदारामध्ये पाण्यावरुन कलगीतुरा, कुठे ते वाचा...?

नांदेड : येथील विष्णुपुरी धरण तुडूंब भरल्याने गेट उघडून पाणी नदी पात्रात सोडण्याऐवजी लाभक्षेत्रातील तलावा भरुन घ्यावे असा सल्ला खासदार हेमंत पाचील यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाला दिला होता. मात्र हा सल्ला या मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांना चांगलाच झोंबला. त्यांनी या प्रकरणी माझ्या मतदार संघात लुडबूड करु नका असा उलट सवाल खासदार हेमंत पाटील यांना दिली आहे. ही मागणी मी मागच्‍या महिम्यातच केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या खासदार व आमदार यांच्या राजकिय वादाच्या चर्चेचा पूर आला आहे. 

नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यात राजकीय वाद झाला असून आमच्या मतदारसंघाच्या गेटमध्ये डोकावण्याची गरज नाही असा टोला आमदार हंबर्डे यांनी खासदार पाटलांना लगावला आहे. विष्णुपुरी प्रकल्प भरल्यानंतर या जलाशयाचे पाणी पुढे सोडण्यापूर्वी या प्रकल्प क्षेत्रातील लहान-मोठे तलाव भरून देण्याची मागणी आमदार हंबर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच केली होती असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु हीच मागणी खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता. १८) केल्याने आमच्या मतदारसंघात नाक खुपसू नका असा सल्ला देत आमदार हंबर्डे यांनी खासदार पाटील यांच्या मागणीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

हेही वाचासंगणक संस्था, एमकेसीएल केंद्र सुरु करण्यास मुभा- डाॅ. विपीन

विष्णुपुरी जलाशयातील पाण्याला राजकीय रंग 

विष्णुपूरीच्या पाण्यावरून राजकीय वाद व त्यानंतर मतदार संघात चर्चेचा पूर आला आहे. यावर्षी पाऊस बऱ्यापैकी पडल्याने धरणे भरले आहेत. त्यामुळे या जलाशयाचे गेट उघडून पाणी सोडले जात असताना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी या जलाशयावर आधारित असलेले सर्व तलाव अगोदर भरून घ्यावेत आणि त्यानंतर गरज वाटली तर जलाशयाचे पाणी सोडावे अशी सूचना प्रशासनाकडे केली होती. खासदार पाटील यांच्या मागणीनंतर राजकीय कलगीतुरा रंगला आहे. विष्णुपुरी जलाशयातील पाण्याला राजकीय रंग आला आहे. दक्षिण नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर तातडीने आक्षेप घेतला आहे. माझ्या मतदारसंघात डोकावण्याची गरज नाही असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

नाचता येईना अंगण वाकडे- शिवसेना जिल्हाप्रमुख बोंढारकर

नांदेड दक्षिण मतदारसंघ कोण्या एकाची मालमत्ता नाही. जे काम आमदार या नात्याने तुम्ही करायला पाहिजे होते ते तुम्हाला सुचले नाही. मात्र खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्याप्रति असलेल्या तळमळीपोटी केले आहे. त्याबद्दल एवढी पोट दुखी का ? असा सवाल शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख (नांदेड दक्षिण) आनंदराव बोंढारकर यांनी आमदार मोहन हंबर्डे यांना केला आहे.

loading image
go to top