esakal | खासदार चिखलीकरांनी ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी केले प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड जिल्ह्यातील ४१४ किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करण्यात आला आहे. नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

खासदार चिखलीकरांनी ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी केले प्रयत्न

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध भागात ४१४ किलोमीटरच्या नवीन रस्ते तयार करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत समावेश करण्यात आला आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे यासाठी पाठपुरावा केला होता.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांना प्रवास करणे अथवा दळणवळणासाठी ही मोठी अडचण येत आहे. अनेक भागातील रस्ते उखडून गेल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि दळणवळणासाठी रस्ते विकास हा एकमेव मार्ग असल्याने ग्रामीण भागाची नाळ पक्क्या रस्त्याने शहरांना जोडली पाहिजे, या अनुषंगाने खासदार चिखलीकर यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीनमध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, नांदेड, लोहा, नायगाव, बिलोली, कंधार, अर्धापूर, मुदखेड, मुखेड, भोकर, उमरी आणि देगलूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर तालुक्यात तब्बल ४१४ किलोमीटरचे रस्ते मंजूर करावेत अशी मागणी केली होती. यासाठी पाठपुरावा केला होता.

हेही वाचा - धोका पत्करून भावासाठी बहीण बाजारात!

या रस्त्यांना मिळाली मंजूरी
धर्माबाद तालुक्यात करखेली ते सालेगांव तालुका सीमा रस्ता, बाभळी पाटोदा खुर्द रोशनगांव रस्ता, चोळाखा चोंडी रस्ता, नांदेड तालुक्यात भालकी चिखली बु. एकदरा रस्ता, नाळेश्वर ते ढोकी, वाघी सुगाव खुर्द रस्ता, सुगाव खुर्द ते वाडी बुद्रुक रस्ता, लोहा तालुक्यात बामणी (पट्टी उस्माननगर) जवळा दगडगाव शेवडी रस्ता, लोहा खेडकर वाडी रामन्याची वाडी हाडोळी (जहांगीर) रस्ता, पार्डी पिंपळगांव ढगे धानोरा पोखरी रस्ता, नायगाव तालुक्यात बरबडा ते चुंगराळा सावरखेड रस्ता, गोळेगांव ते खंडगांव ते कोपरा ते मरवाळी - मरवाळी तांडा रस्ता,इकळीमोर हंगरगा ते परडवाडी सांगवी रस्ता, मरवाळी ते माहेगांव ते कारला तम रस्ता, बिलोली तालुक्यात कोल्हे बोरगांव ते बेळकोणी ते सावळी रस्ता, बिलोली ते आळंदी रस्ता, बिलोली कोटग्याळ ते कारला बुद्रुक, औराळा ते काटकळंबा ते तालुका सीमा नायगाव रस्ता, जंगमवाडी ते फुलवळ ते मुंढेवाडी ते वाखरड रस्ता, अर्धापूर ते शेळगांव खुर्द ते तालुका सीमा रस्ता, अर्धापूर ते सावरगांव कोंडा ते देळूब बुद्रुक रस्ता, अर्धापूर ते पिंपळगांव महादेव ते तालुकासीमा रस्ता, मुदखेड ते हज्जापूर - चिकाळा तांडा, मुदखेड ते रोही पिंपळगांव वसंतवाडी, मुदखेड ते दरेगांववाडी - पांगरगांव- गोपाळवाडी रस्ता, भोकर बोरगांव ते थेरबना रस्ता, भोकर तालुक्यात लांबकानी ते हाडोळी ते कामनगांव रस्ता, ताटकळवाडी ते शिंगारवाडी रस्ता, बोरवाडी ते समंदरवाडी ते जांभळी ते तालुका सीमा ते वरदडा रस्ता. 

या तालुक्यातील रस्त्यांना मिळाली मंजुरी
मुखेड तालुक्यात राजुरातांडा - राजुरा - अंबुलगा रस्ता, सीमा जांब खुर्द ते होंडाळा - सावरगांव - देवला तांडा, भवानी तांडा ते जांभळी रस्ता, अंबुलगा ते ठाणा रस्ता, उमरी तालुक्यात शेलगांव रेल्वे स्टेशन पळसगांव तांडा, कारला - कारला तांडा रस्ता, सांवरगांव कला ते हुंदा (उमरी पट्टी) रामखडक बाचेगांव बोळसा खुर्द- बोळसा बुद्रुक रस्ता, निमटेक ते तालुका सीमा रस्ता,  देगलूर तालुक्यात झरी पेडंपल्ली देवापूर येरगी राज्य सीमा रस्ता, हाणेगांव बिजलवाडी तांडा रस्ता, किनी दावणगीर तांडा मरखेल वळग रस्ता यांना मंजुरी मिळाली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - मुखेडच्या चांडोळा सज्जाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

या तालुक्यातील रस्ते मंजूरीची मागणी
किनवट तालुक्यातील ३८ किलोमीटर,  हदगाव तालुक्यातील ३५ किलोमीटर, हिमायतनगर तालुक्यातील २५ किलोमीटर, माहूर तालुक्यातील १७ किलोमीटर असे ४१४ किलोमीटरचे रस्ते मंजूर करण्याची मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते वाचून होणार त्रास कमी होणार असून त्या भागातील रस्त्यांचा कायापालट होणार असल्याने खासदार चिखलीकर यांचे अनेकांनी आभार मानले आहेत.