वीज थकबाकीमुळे बत्ती गुल होण्याचे संकेत

डॉ. गोंदावले यांचा इशारा; जिल्ह्यात ५४५ कोटी ६९ लाखांची थकबाकी
msedcl recovery arrears gondavale electricity bill nanded
msedcl recovery arrears gondavale electricity bill nandedsakal

नांदेड : जिल्ह्यातील कृषीपंपधारक वगळता इतर लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांकडे थकीत असलेल्या ५४५ कोटी ६९ लाख रूपयांच्या वसुलीसाठी अनेकवेळा प्रत्यक्ष संवाद साधून अनेक ग्राहक वीजबील भरत नाहीत. यामुळे त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करणे, हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी प्राधान्याने वीज बीले भरावीत अन्यथा थकबाकीमुळे बत्तीगुल होण्याचे संकेत महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील थकबाकीचा आढावा तसेच नांदेड शहरातील वीजपुरवठा खंडीत केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी करत जिल्ह्यातील वाढत्या थकबाकीबाबत डॉ. गोंदावले यांनी चिंता व्यक्त केली. थकबाकी भरली नाही तर वीजपुरवठा खंडीत करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे सांगत थेट वीजपुरवठा खंडीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. थकबाकी वसूलीत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा देत शंभर टक्के वसुलीसाठी प्रयत्न करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असे ठणकावले आहे.

जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील एक लाख ९५ हजार १३७ वीज ग्राहकांकडे ४५ कोटी ५७ लाख रूपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील दोन हजार ८५७ सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांकडे १५४ कोटी २९ लाख रूपये तसेच पथदिवे वर्गवारीतील तीन हजार ४३१ ग्राहकांकडे ३४१ कोटी ९९ लाख रूपयांची थकबाकी आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहक वगळता लघुदाब वर्गवारीतील दोन लाख चार हजार ३९५ ग्राहकांकडे ५४५ कोटी ६९ लाख रूपयांची थकबाकी आहे.

याप्रसंगी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण तसेच प्रादेशिक कार्यालयाचे अभियंता विपुल पिंगळे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मागील महिन्यात वीजबील वसुली करत असताना मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला व मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com