नांदेड : वीजचोरून वापरणाऱ्या 24 आकोडेबहाद्दरांवर महावितरणची कारवाई

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने आज वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. या मोहिमेअंतर्गत कीनवट उपविभागाअंतर्गत येणाऱ्या दोन गावामधील आकोडा टाकून अनधीकृतपणे वीज वापरणाऱ्या 24 लोकांवरती वीजकायदा 2003 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा, अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र  नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकोडे टाकून वीजवापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

नीचपुर गावातील 16 तसेच राजगड तांडा येथील आठ अशा एकूण 24 लोकांविरोधात 

या विशेष  मोहीमेला गती देण्याच्या दृष्टीने नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या सुचनेनुसार कीनवट उपविभागा अंतर्गत वीजचोरांवरती मोठयाप्रमाणावर कारवाई केली जात आहे. वारंवार अधीकृतपणे वीज कनेकशन घेण्याबाबत विनंती करुनही अनेक लोक वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर आज आक्रमकपणे जोरदार मोहीम राबवून नीचपुर गावातील 16 तसेच राजगड तांडा येथील आठ अशा एकूण 24 लोकांविरोधात  वीजकायद्यान्वये वीजचोरीची कारवाई करण्यात आली आहे.

वीज चोरून वापरणाऱ्यांना मज्जाव करावा

कीनवट उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आर.आर. परचाके, कर्मचारी श्री नखाते, श्री जाधव, श्री कनके तसेच शेख या कारवाईत सहभागी होते. रोहीत्र नादुरूस्त होण्याच्या प्रकारात होणारी वाढ लक्षात घेता यापुढेही अशी कारवाई मोठयाप्रमाणावर करण्यात येणार असून वीजग्राहकांनी अधिकृतपणेच वीज वापर करावा. त्याचबरोबर आपला वीजपुरवठा अखंडीत रहावा यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेत वीज चोरून वापरणाऱ्यांना मज्जाव करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com