esakal | उमरी खूनप्रकरण : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, दोघांनाही केले अटक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बल्लाळ (ता. भोकर) येथील खूनप्रकरण, प्रेमी जोडप्याविरुद्ध उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. दोघांनाही केले अटक.

उमरी खूनप्रकरण : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, दोघांनाही केले अटक

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : भोकर तालुक्यातील बल्लाळ येथील मारुती गाडेकर या तरुणाच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. अनैतीक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. पोलिसांनी मयताची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांनाही अटक केली आहे.

सोमवारी (ता. सहा जुलै) रोजी दुपारी तीनच्या सुमारास मारुती गंगाधर गाडेकर (वय ३४) या शेतमजुराचा बल्लाळ शिवारात असलेल्या मोहन श्रीखंडे यांच्या शेता शेजारील गायरानमधील एका झुडपात मारुती गाडेकर याचा मृतदेह आढळून आला होता. तो मोहन श्रीखंडे यांच्या शेतावर शेतमजुरीसाठी गेला होता. परंतु तो घरी परत आला नसल्याने त्याचा शोध घेण्याचे नाटक त्याच्या पत्नी व अन्य नातेवाईकांनी सुरू केला. त्यानंतर मंगळवारी (ता. सात) दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह एका झुडपात आढळून आला. याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचायांचा’ अखेरचा प्रवासही वेदनादायकच...कोणाचा ते वाचा?

थर्ड डिग्रीचा वापर करताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले

मारुती गाडेकर याच्या मृत्यूबद्दल पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची पत्नी आशाबाई हिला ताब्यात घेतले. तीचा प्रियकर असल्याचे समजताच गोविंद भीमराव जाधव यालाही ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी केली परंतु ते सुरुवातीला आम्ही असा प्रकार कसा करणार असे सांगत होते. अखेर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करताच हे दोघेही पोपटासारखे बोलू लागले. आणि त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आमच्या दोघांतील अनैतीक संबंधाच्या आड येत असल्याच्या कारणावरून पती मारुती गाडेकर याचा रुमालाने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. 

उमरी पोलिसांनी केले अटक

तसेच ही घटना कोणालाही माहिती होऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह एका झुडपात लपून ठेवल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली. यावरून उमरी पोलिसांनी बुधवार (ता. आठ) गोविंद भिमराव जाधव व आशाबाई मारुती गाडेकर दोघे राहणार बल्लाळ (ता. भोकर) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला  असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी सांगितले. त्यांना न्यालयात हजर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

loading image
go to top