esakal | नांदेड : मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यासाठी १० लाखास फसविले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पावडेवाडी नाका येथील खात्यावर १० लाख रुपये टाकण्यास सांगितले. शिक्षक खानझोडे यांनी मुलाचा नंबर मेडिकल कॉलेजला लागत आहे. 

नांदेड : मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यासाठी १० लाखास फसविले

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पावडेवाडी नाका नांदेड येथील खात्यावर १० लाख रुपये टाकण्यास सांगून एका शिक्षकाची फसवणुक केली आहे.


विजयनगर भागातील शिक्षक दत्ता खानझोडे (रा. विजयनगर, नांदेड) यांच्या मुलाचा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे अभिषेक रंजन, हरिश जैन दोघे राहणार बेंगलोर या दोघांनी संगणमत करुन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पावडेवाडी नाका येथील खात्यावर १० लाख रुपये टाकण्यास सांगितले. शिक्षक खानझोडे यांनी मुलाचा नंबर मेडिकल कॉलेजला लागत आहे. 

हेही वाचा - नांदेडमध्ये जबरी चोरीतील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक, एका महिलेचा आहे समावेश -

या आपेक्षेने आरोपींच्या विविध बँकेच्या खात्यावर ता. ३० डिसेंबर २०२० ते ता. ३१ डिसेंबर २०२० दरम्यान पावडेवाडी नाका येथील महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखेतून १० लाख रुपये टाकले. परंतू मुलाचा मेडिकल कॉलेजला नंबर मात्र लागला नाही. संबंधीत आरोपींनी फसवणुक केल्याची बाब लक्षात येताच दत्ता खानझोडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. आरोपी अषेक रंजन, हरिष जैन यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीपाद डोके करत आहेत. 

loading image
go to top