esakal | नांदेड : स्वातंत्र्यसैनिक विठाबाई पावडे स्मृतीनिमित्त स्मशानभूमीस ११ आसन खुर्च्या समर्पित
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमी पावडेवाडी

नांदेड : स्वातंत्र्यसैनिक विठाबाई पावडे स्मृतीनिमित्त स्मशानभूमीस ११ आसन खुर्च्या समर्पित

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराला लागूनच असलेल्या पावडेवाडी येथील स्वातंत्र्यसैनिक कै. विठाबाई रावसाहेब पावडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले ९० व्या वर्षी निधन झाले. हिंदू संस्कृतीप्रमाणे तेरावा केला जातो. पाहुणे व गावातील लोकांचा जेवणाचा मोठा कार्यक्रम असतो. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांच्या मुलांनी तेरावा रद्द करून होणाऱ्या खर्चातून गावातील स्मशान भूमीसाठी ११ आसन खुर्च्यां समर्पित केल्या आहेत. हा नवा आदर्श असून परिसरातून या परिवर्तनवादी निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. लाखो लोक यात मृत्युमुखी पडत आहेत. मागील महिनाभरात पावडेवाडी या एकाच गावात सहा व्यक्ती कोरोनाचे बळी पडले आहेत. नांदेड शहरात गोवर्धनघाट येथे तर अंत्यविधीसाठी वेटिंग आहे. ही गरज ओळखून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा पोलिस पाटील कै. रावसाहेब पावडे यांच्या पत्नी स्वातंत्र्यसैनिक कै. विठाबाई पावडे यांच्या तेरावाचा कार्यक्रम रद्द करुन त्यांच्या मुलांनी गावातील स्मशानभूमीस ११ आसन खुर्च्या दिल्या आहेत. गावातील स्मशानभूमी ही प्रशस्त असून लाईट, पाणी, बांधकाम, सापळा इतर सुविधा उपलब्ध असून गावातील तरुणांनी वृक्षारोपनही केले आहे. आसन खुर्च्यांची गरज होती त्याही आता उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा - नांदेड : निसर्गाचा चमत्कार; कडू लिंबाच्या झाडावर पिंपळ, वडाचे झाड

काळाची गरज ओळखून परिवर्तन होणे गरजेचे असते. जुन्या रुढी प्रथा परंपरांना फाटा देत हा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्यांची मुले सुरेशराव, नायबराव, दिगंबरराव, दादाराव, गुलाबराव व नातू अनिल यांनी समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे. हाच आदर्श घेऊन समाजात सकारात्मक कार्याचा पायंडा पडला पाहिजे हाच संदेश या कृतीतून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. असे त्यांच्या मुलांनी मत व्यक्त केले.

loading image