नांदेड : बियाण्यांची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांची लूट

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Nanded Agricultural Service Centre fake scarcity of seeds farmers fraud
Nanded Agricultural Service Centre fake scarcity of seeds farmers fraudsakal

मारतळा : येथील बाजारपेठेत कृषी सेवा केंद्र चालकाकडून खत व बी-बियाणे यांची कृत्रिम टंचाई दाखवून जादा दराने विक्री करत शेतकऱ्यांची लूट चालू असल्याची थेट तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे शुक्रवारी रोजी लेखी निवेदनाद्वारे केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यात केली आहे.

या निवेदनात नमुद केले आहे की, परिसरातील शेतकरी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ,ज्वारी, तूर आदी पिकांची पेरणी करताना डीएपी खत देतात. त्यामुळे डीएपीची मागणी व सोयाबीन बियाणेची वाढती मागणी लक्षात घेऊन, येथील कृषी सेवा केंद्र चालकांनी कृत्रिम टंचाई दाखवत, मागच्या दाराने गोडाऊन मधून जादा दराने खताची विक्री करत शेतकऱ्यांनी लूट करत आहेत. त्यातही विशेष म्हणजे भाव फलक व स्टॉक नोंद फलक लावलेले नाहीत. तसेच डीएपी खताचे पोते १३५० रुपयाला असून ही विक्री मात्र १५५० व १६०० रुपयांना होत असून प्रत्यक्षात १३५० रुपयाचे बील तेही साध्या कागदावर लिहून देत असल्याचे, त्यात नमूद केले आहे. मारतळा येथील व्यंकट ढगे, गजानन येडे, कोंडजी उबाळे, संदिप येडे आदींसह १५ शेतकऱ्यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com