नांदेड : महिलांचे दागिणे लंपास करणारे विमानतळ पोलिसांच्या तावडीत, मिळाली कोठडी

file photo
file photo

नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्मनुष्य रस्त्यावर दुचाकीस्वारांना गाठून वेळप्रसंगी त्यांना मारहाण करुन किंमती वस्तू व महिलांच्या अंगावरील दागिने पळविणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीने या भागात वेगवेगळ्या रस्त्यावर गंभीर गुन्हे करुन पोलिसांना आव्हान दिले होते. मात्र विमानतळ पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रमुख विजय जाधव यांनी शिताफीने या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीत वापरलेली एक दुचाकी आणि महिलेचे ४० हजार रुपयांचे गंठण जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. २४) डिसेंबरच्या रात्री करण्यात आली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मालटेकडी गुरुद्वारा परिसरातील पुलाखाली लुटमारीच्या आणि जबरी चोरीच्या घटना घडताहेत. अशातच दोन डिसेंबर २०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास तक्रारकर्ता व त्यांची पत्नी हे एका दुचाकीवरुन गावाकडून नांदेडमध्ये येत होते. यावेळी दबा धरुन बसलेल्या अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला. तक्रारकर्त्याची दुचाकी पुलाखाली येताच पाठीमागून येऊन महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण जबरीने तोडून पळ काढला होता. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे आणि पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी हाती घेतले. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन विजय जाधयांनी आपले सहकारी हवालदार श्री. राठोड, बंडू कलंदर आणि श्री. केंद्रे यांनी शहरात गस्त घातली. मिळालेल्या माहितीवरुन शहराच्या फारुखनगर भागातून अमीर इलियास अब्दुल पाशा शेख ( वय २१) आणि त्याच्या सांगण्यावरुन लेबर कॉलनी येथील मोहम्मद मोबीन मोहम्मद जिलानी (वय २८) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच २६-एक्स-१२७७) आणि चोरीला गेलेले ४२ हजार रुपयांचे गंठण जप्त केले. त्यांना विमानतळ पोलिसांनी दाखल गुन्ह्यात घेऊन विजय जाधव यांनी शुक्रवारी (ता. २५) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडीत पाठवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com