नांदेड : अण्णाभाऊ साठे यांचा कामगार विषयक दृष्टिकोन या विषयावर प्रा. माधव जाधव यांचे व्याख्यान

file photo
file photo

नांदेड - अण्णाभाऊ साठे सभागृह नवीन नांदेड सिडको येथे सोमवार ( ता.30 ) नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा कामगार विषयक दृष्टिकोन या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य माधव जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे शहराध्यक्ष भास्कर साबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत, तर उद्‌घाटन चर्मकार समाज समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष प्रबोधनकार तुकाराम टोंपे यांच्या हस्ते होणार आहे.

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष, मानगाव परिषद शताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यप्रारंभ वर्ष या गोष्टींचे औचित्य साधून 31 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत बारा महिन्याचे बारा व्याख्यानं अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स आणि बहुजन मजूर कामगार आघाडीच्या वतीने घेतले जाणार असून सदरील व्याख्यान हे चौथे आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी, डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा सामाजिक संघर्ष आणि त्यांच्या अनुयायांची जबाबदारी, मातंग समाज व त्याचं राजकारण आदी विषयांवर व्याख्यानं घेण्यात आली आहेत.

याप्रसंगी नगरसेविका बेबीताई गुपिले, प्राचार्य पी. एन. भालेराव, दत्तात्रय जाधव, आनंद गुंडिले, उद्योजक माधव डोंपले, सागरबाई वाघमारे, उपसरपंच बळीरामपूर, राजू लांडगे, डी. गा. पाटील, बालाजीराव गवाले आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी सुरेश वाघमारे, नामदेव झुंजारे, बाबू शिंदे, अरूणाताई बाबळे, विठ्ठलराव चिंचोले, सचिन गादेकर, राजेश वाघमारे, गणपत गोमस्कर, मल्हारी भोपाळे, हिरामण मेकाले, बाबू शेळके, राम बाबळे, अवधूत कांबळे, काशीम सय्यद, आत्माराम गायकवाड, सोपान नकुले, संभाजी मेकाले, विश्वनाथ सूर्यवंशी आदींनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com