नांदेड : अर्धापुरात चार महिन्यापासून धान्य वाटप ठप्प

प्रशासनाचा हलगर्जीपणा; लाभार्थ्यांना महागाईसोबत व्यवस्थेचे चटके
Ardhapur Grain distribution stopped for four months
Ardhapur Grain distribution stopped for four monthssakal

अर्धापूर : शहरासह तालुक्यातील रास्त भाव दुकानातून वाटप करण्यात येणारे धान्य गेल्या चार महिन्यांपासून ठप्प झाल्याने लाभार्थ्यांना महागाईसोबत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चटके बसत आहेत. लाभार्थी धान्य मिळण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानकडे चकरा मारत आहेत. मोफत व पैसा देवून वाटप करण्यात येणारे धान्य वाटप यंत्रणा ठप्प झाली आहे. जिल्हा प्रशासनाने गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीत असलेल्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

एकीकडे महागाई तर दुसरीकडे प्रशासनाची बेपर्वाई अशा साठमारीत जनता मात्र भरडली जात आहे. अशीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यातील सोळा तालुका असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले असून दररोज नवनवीन उच्चांक गाठला जात आहे. या वाढत्या महागाईच्या काळात शासनाच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या धान्यामुळे खूप मोठा आधार मिळत आहे. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धान्य वाटपात खूप मोठी तफावत निर्माण होत असून तीन ते चार महिने वाटप उशिरा केले जात आहे.

शहरांसह तालुक्यातील विविध योजनेतून धान्य वाटप करण्यात येतात. लाभार्थाना दोन रूपये किलो गहू तर तीन रुपये किलो या दराने धान्य वाटप करण्यात येते. तसेच मोफत धान्यही वाटप करण्यात येते. पण मार्च महिन्यात केवळ सशुल्क असलेले धान्य वाटप करण्यात आले आहे तर मार्च ते जून या कालावधीत मोफत धान्य वाटप करण्यात आले नाही. तसेच सशुल्क असलेले धान्य एप्रिल ते जून या कालावधीत धान्य वाटप करण्यात आले नाही. याचा मोठा फटाका लाभार्थ्यांना बसत आहे आहे. बाजारातून‌ जादा पैसे देऊन धान्य खरेदी करावे लागत आहे.

धान्य वाटप करण्यासाठी आमची यंत्रणा कार्यरत आहे. पण काही तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे. लवकरच धान्य वाटप करण्यात येईल.

- उज्ज्वला पांगरकर, तहसीलदार, अर्धापूर.

आम्ही गेल्या चार महिन्यापासून रास्त भाव धान्य दुकानदाराकडे चकरा मारीत आहोत. पण धान्य मिळत नाही. त्यामुळे आम्हाला बाजारातून जादा भावाने धान्य खरेदी करावे लागत आहे. प्रशासानाने तातडीने उपाययोजना करुन धान्य वाटप सुरळीत करावे.

- गजानन मेटकर, लाभार्थी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com