
नांदेड : बाळापूर येथील पांदण रस्त्याचे काम सुरु
धर्माबाद : आमदार राजेश पवार यांनी जणू काही आपल्या मतदार संघातील संपूर्ण पांदण रस्त्याचे अद्ययावतीकरणांचा विडाच उचलला की काय असा प्रश्न पडत असून धर्माबाद तालुक्यातील बाळापुर शिवारातील तब्बल दोन किलोमीटर या सर्वात जास्त लांबीच्या पांदण रस्त्यांच्या विकासाचे काम त्यांच्याकडून चालू झाले आहे.
आमदार राजेश पवार यांनी आपल्यातर्फे विनामूल्य जेसीबी मशीन उपलब्ध करून दिली असून गावकऱ्यांच्या लोकसहभागातून डिझेलचा खर्च भागविला जात आहे. सदरील रस्त्यामुळे बाळापुर शिवारातील तब्बल ७० शेतकऱ्यांना फायदा होणार असून पावसाळ्यात होणाऱ्या मरणयातना आता थांबणार आहेत. धर्माबाद तालुक्यातील आत्तापर्यंत चोवीस गावांमध्ये पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाले असून काही गावात एक पांदण रस्ता तर काही काही गावात तीन तीन पांदण रस्ते जेसीबी मशीन द्वारे सुधारण्यात आलेले आहेत.
त्या संपूर्ण रस्त्याची लांबी जवळपास ५० ते ६० किलोमीटर भरणार असून भविष्यातही त्या रस्त्याच्या मजबुतीकरणांचाही मानस आमदार राजेश पवार यांनी बोलून दाखवला असून धर्माबाद तालुक्यातील तब्बल वीस किलोमीटर पांदन रस्त्यांच्या अद्ययावतीकरणासाठी त्यांनी शासनाकडे शिफारस केली आहे. पर कीलोमीटर साठी वीस लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे. या वेळी शुभारंभ प्रसंगी सतीश मोटकूल, व्यंकटेश अबुलकोड यांच्यासह संबंधित रस्त्यावरील लाभधारक शेतकरी स्त्रिया व पुरुष उपस्थित होते.