नांदेड : बिलोलीत दिग्‍गजांना मिळाला दिलासा

पालिकेत पुन्हा तेच ते चेहरे दिसण्याची शक्यता
Nanded Biloli municipal election Ward wise reservation announced
Nanded Biloli municipal election Ward wise reservation announcedsakal

बिलोली : बिलोली नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडतीत फारसा काही महत्त्वपूर्ण बदल झाला नसल्याचे चित्र आहे. मागील दोन दशकांपासून पालिकेत वावर असलेल्या चेहऱ्यांना पुन्हा संधी लाभणार आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनेक दिग्गजांना दिलासा मिळाला आहे.

मागील एका दशकांपासून शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. शहराच्या विकासाला कुठलीही दिशा मिळत नाही. सत्ताधाऱ्यांना आपल्या शहराबद्दल आत्मीयता नसल्याचे अनेक प्रकरणावरून दिसून येत आहे. शहराच्या विकासाला एका नवीन उंचीवर घेऊन जाणारे नेतृत्व लोप पावले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात पालिकेतील ४० टक्के पेक्षा अधिक सत्ताधारी नगरसेवक व शहराचा गाडा हाकणारे नेतृत्व शहराबाहेर राहूनच कार्यकाळ चालवला त्यामुळे शहरातील नागरी समस्यांमध्ये अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत.

तेलंगणा मराठवाडा चैनी लगत असलेल्या बिलोली तालुक्याला व शहराला विकासाची खीळ बसली आहे. दुरदृष्टीचे नेतृत्व नसल्यामुळे काहीजण पालिकेचे राजकारण म्हणजे सुगीचे दिवस अशाप्रकारे संबोधून कार्यकाळ पूर्ण करून स्वहित साधून घेत आहेत. निवडणुकीच्यावेळी पैशाचा पाऊस पाडणे व निवडून आल्यानंतर कुठलेही ठोस निर्णय न घेता खर्च झालेला पैसा पुन्हा काढणे अशा प्रकारचे चित्र निर्माण झाल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. मागील अनेक वर्षापासून पालिकेत तेच ते चेहरे सत्तेत आहेत.

माजी आमदार गंगाधरराव पटणे, माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे यांचे राजकीय हाडवैर असले तरी ते जनतेत जाणवले नाहीत मात्र मागील दहा वर्षात बिलोलीचा विकास अपेक्षेप्रमाणे झाला नाही. नवीन जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार बिलोली पालिका सतरा नगरसेवकावरून वीस नगरसेवकांची होणार आहे. त्यातूनच नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. प्रभाग वाढल्याने नगरपालिकेतील नगरसेवकांची कार्यक्षेत्र कमी झाले आहे त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठीचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

आगामी काळात सत्तेवर येणाऱ्या मंडळींनी शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालावा शहराच्या विकासाबद्दल आस्था बाळगून वाटचाल करावी शहरातील किमान नागरी सुविधांना प्राधान्य देत रस्ते पाणी नाली व आरोग्य यात सुधारणा घडवून आणावी बिलोली शहर तालुक्याचे ठिकाण असूनही येथे बहुतेक सुविधा नाहीत याकडे पालिकेतील भावी मंडळींनी व प्रशासनाने लक्ष वेधावे नागरिकांची अपेक्षा आहे.

नेतृत्वावर येथील सुजाण नागरिकांचा विश्वास

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर येथील सुजाण नागरिकांचा विश्वास आहे. तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली बिलोली पालिका भाजपच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या मुळे आगामी पालिका निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होणार असली तरीही बिलोलीच्या राजकारणातील भीष्म म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार गंगाधरराव पटने हे ऐनवेळी काय भूमिका घेतील यावरही चर्चा होत आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल काय ?

नगराध्यक्ष भीमराव जेठे, संतोष कुलकर्णी, विजय कंचनार, प्रकाश पोवाडे, उत्तम जेठे, इंद्रजीत यादवराव तुडमे, अनुप अंकुशकर, माजी नगराध्यक्ष सुभाष पवार, विजयकुमार कुंचनवार, नगरसेवक जावेद कुरेशी, यशवंत गादगे, मारुती पटाईत, नागनाथ तुम्मोड यांच्यासह डझनभर आजी-माजी दिग्गजांना दिलासा मिळाला आहे. पुन्हा तेच ते चेहरे पालिकेत दिसणार असल्याची चर्चा असल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com