esakal | नांदेड : बीटी कपाशीवर बोंडआळीचा मारा- कापसात सोडली जनावरे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून कापूस पिकावर शेतकऱ्यांचा वर्षभराचा प्रपंच अवलंबून असतो,परंतु बोंडआळी मुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडल्याचे भयावह चित्र निर्माण झाले असून शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्ट्या पुरता खचून गेला आहे.

नांदेड : बीटी कपाशीवर बोंडआळीचा मारा- कापसात सोडली जनावरे

sakal_logo
By
साजिद खान

वाई बाजार (माहूर, जि.नांदेड) : परतीच्या पावसाने झोडपल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाया गेले, तर आता मोठ्या प्रमाणात कापसावर बोंड आळीचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने कापूस पिके देखील उध्वस्त होत आहे. माहूर तालुक्यातील शेतकरी शेतातील घाटराने लगडून असलेल्या पऱ्हाटी काढून फेकत आहे. तर दुरीकडे अधिकांश शेतकऱ्यांनी कापूस पिकात जनावरे सोडली आहे. खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून कापूस पिकावर शेतकऱ्यांचा वर्षभराचा प्रपंच अवलंबून असतो, परंतु बोंडआळी मुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडल्याचे भयावह चित्र निर्माण झाले असून शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्ट्या पुरता खचून गेला आहे.

कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे माहूर तालुक्यातील शेकडो एकरवरील पिके वाया गेली आहे. पिक व्यवस्थापनाविषयी अपुरे ज्ञान व त्यात कृषी विभागाची शेतकऱ्यांप्रती उदासिनता कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय बोगस बि.टी. बियाण्यांची चर्चा ही होत आहे. काही का असेना सोयाबिन नंतर कपाशीचे पिक ही हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांची दिवाळी अंधारातच होण्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचानांदेड परिक्षेत्रातील अवैध धंदे बंद करा- पोलिस अधिकाऱ्यांना निसार तांबोळींच्या सुचना -

परतीच्या पावसाने काढणीस आलेले सोयाबिनचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची सारी भिस्त कपाशीवरच होती.कपाशीपासून अपेक्षीत उत्पन्न मिळून निदान लावगड खर्च तरी भागेल असे वाटू लागताना बोंडअळीचे नवे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले असून यामुळे त्यांचे सारे मनसुबे उधळले गेले. माहूर तालुक्यातील खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी एक तृतियांश क्षेत्र कपाशीचे आहे. परतीच्या पावसानंतर बोंड आळी शेतकऱ्यावर घातलेल्या घाल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून पऱ्हाटी काढून शेतात जनावरे सोडण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

तालुका कृषि विभागाचे मार्गदर्शन शिबिर;शिवार भेट नाही.

बोंडसड व बोंड अळीची समस्या निर्माण होऊन चिंताजनक परिस्थिती आली असताना बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना उपाय योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाने सर्वदूर माहिती, मार्गदर्शनपर उपक्रम सातत्याने राबवावेत तसेच नुकसान होत. असलेल्या क्षेत्राची पाहणी वेळीच करावी असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु या संदर्भाने माहूर तालुका कृषी विभागाने काहीच दिवे लावले नाही. त्यामुळेच की, काय शेतकऱ्यावर कापशी पिकाला आलेल्या बोंड आळी संकटावर मात करता आली नाही.व त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे.

साडेचार एकर शेतात कापूस पिकाची लागवड केली होती परंतु ऑइल कापूस वेचणी च्या वेळेस परतीचा पाऊस त्यामुळे सुरुवातीची दर्जेदार कापूस देणारी बोंड सडली वाता बोंड आळी लागून संपूर्ण बोंडाला कीड लागली.गेल्यावर्षी आतापर्यंत ५५ क्विंटल कापूस घरी आले होते.यावर्षी मात्र दहा क्विंटल कापूस निघाले बोंड अळीमुळे पऱ्हाटी काढून फेकण्याची वेळ आली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सुरेश रतन राठोड,शेतकरी लखमापुर,ता.माहूर

loading image
go to top