esakal | नांदेड : विद्युत भवनात पार पडला थकबाकीमुक्त महिला शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा

बोलून बातमी शोधा

file photo

जागतिक महिला दिन: महिला सक्षमिकरणात महावितरणचा पुढाकार, कृषिपंपाच्या थकबाकी वसूलीस सहकार्य करणाऱ्या महिला सरपंचांनाही केले सन्मानीत

नांदेड : विद्युत भवनात पार पडला थकबाकीमुक्त महिला शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाकृषी ऊर्जा पर्वाच्या निमित्ताने शेतकरी महिला, महिला सरपंच, महावितरणच्या दामिनी अर्थात महिला जनमित्र त्याचबरोबर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळावं याकरिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महातिवरणच्या वतीने पाच शेतकरी महिलांचा व तीन महिला सरंपंचांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर व अधिक्षक अभियंता संतोष वहाणे, कार्यकारी अभियंता जे. एल. चव्हाण यांच्या प्रमूख उपस्थितीत विद्यूत भवन येथे आज पार पडलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या महिला सक्षमीकरणात महावितरणचा पुढाकार या संकल्पनेला मुर्त स्वरूप देण्याचे काम आज जागतिक महिला दिनाच्या निमितताने पार पडले. 

हेही वाचाWomens day 2021 : डोळ्यात अंजन घालणारा अंजनाबाईचा संघर्ष; कसा आहे त्यांचा प्रवास ?

नांदेड मधील कृषिपंपाची वीजदेयक थकबाकी भरून मुकत झालेल्या पार्डीमक्ता येथील अनुसयाबाई रामराव कस्तूरे, छायाबाई सुधाकर देशमुख, कोन्दाबाई शंकरराव तसेच तुप्पा येथील कलावतीबाई संतूकराव यमलवाड आणि लहान येथील नंदाबाई बलवंतराव या पाच महिला शेतकऱ्यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर कृषिपंपाच्या थकबाकी वसुलीत सहकार्य करणाऱ्या किकी गावच्या सरपंच कविता रवी देशमूख, खचेगावच्या सरपंच सविता बालाजी खोराडे आणि राहेगावच्या सरपंच सत्यभामाबाई सुरेश बन तीन महिला सरपंचांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वीजबील वसुलीत विशेष कार्य करणाऱ्या महिला जनमित्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात नांदेड मंडळाच्या मानव संसाधन विभागाच्या व्यवस्थापक प्रांजली कांबळे, उपकार्यकारी अभियंता श्रीमती पिलंगवाड तसेच ॲड. शैलेंद्र पाटील यांनी महिला दिनाचा इतिहास सांगत महिला सक्षमिकरणाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋतूजा बंगाळे यांनी तर प्रास्ताविक अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्नेहलता हंचाटे यांनी केले व आभार प्रदर्शन राजकुमार सिंदगीकर यांनी केले.