कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत द्या : चंद्रकांत पाटील

पंचनामे न करता सरसकट भरपाईची मागणी
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलsakal

हिंगोली : राज्यात अतिवृष्टीने पिकांसह जमीनी खरवडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकार कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार करते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही कर्ज काढून पंचनामे न करता सरसकट भरपाई दिली पाहिजे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

येथे बुधवारी (ता. २०) झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली होती. ती नऊ हजार ६०० कोटींची होती. पीकविमाही दिला. आता महाविकास आघाडी सरकारनेही भरपाई दिली पाहिजे. अतिवृष्टीने राज्यात ३८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात ८२ टक्के सोयाबीनचा समावेश आहे. पिकांसह अनेक शेतकऱ्यांची शेती खरवडून गेली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

चंद्रकांत पाटील
TRUTH Social - ट्रम्प यांचा स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे व तातडीने मदत द्यावी. आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे उपस्थित होते.

ज्येष्ठांनी मंदिरात राऊतांचे अग्रलेख वाचायचे का?

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपने अनेक वेळा आंदोलन केले, घंटानाद केला, शंखनाद केला. त्यानंतर सरकारला जाग आली आणि मंदिरे उघडली. तरीही साठ वर्षांवरील नागरिकांना प्रवेश मनाई, मंदिरात भजन, कीर्तनाला मनाई केली आहे. मग ज्येष्ठांनी मंदिरात जाऊन संजय राऊत यांचे अग्रलेख वाचायचे काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला.

चंद्रकांत पाटील
ब्राझीलचे अध्यक्ष गोत्यात; हेतुपुरस्सर गुन्ह्यासह संसद नऊ आरोप ठेवणार

हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही एकही मंत्री आला नाही, ही गंभीर बाब आहे. त्यासाठी आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, प्रत्येक निवडणूक लढवलीच पाहिजे. पराभव पत्करावा लागला तरी चालेल, पण बिनविरोध निवडणूक होऊ देऊ नका. मुंबईसह राज्यात शिवसेना- भाजपने एकत्रित निवडणुका लढविल्याने फायदा झाला आहे. शिवसेनेने एकट्याने निवडणूक लढवल्यानंतर किती जण निवडून येतात, ते पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com