Nanded : चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी

भाजपच्या महिला आघाडीतर्फे निवेदन
अत्याचार प्रकरणात
अत्याचार प्रकरणात Sakal

नांदेड : कामठा येथील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकावावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी मंगळवारी (ता. १४) निवेदनाद्वारे केली आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना सदरील निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले की, अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे सहा फेब्रुवारी रोजी सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपीवर पॉस्को कायद्याअंतर्गत कठोरातील कठोर कारवाई व्हावी.

या प्रकरणाचा तपास तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत करावा. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्यासह महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शीतल भालके, जिल्हा सरचिटणीस श्रद्धा चव्हाण, अपर्णा चितळे, सुमित्रा वडस्कर आदी महिला उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com