esakal | नांदेड : चाईल्ड लाईनचा मैत्रीचा बंध बांधणे उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विविध सामाजिक संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यासह विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे चाइल्ड लाइन दोस्तीचे बंद बांधणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नांदेड : चाईल्ड लाईनचा मैत्रीचा बंध बांधणे उपक्रम

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे चाईल्ड लाईनचे दोस्ती कार्यक्रम संपन्न ता. 20 नोव्हेंबर रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर नांदेड येथे बंद बांधणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध सामाजिक संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यासह विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे चाइल्ड लाइन दोस्तीचे बंद बांधणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे व संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) कल्पना राठोड यांनी प्रथम सर्वांचा परिचय करुन दिला.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना करावी लागतेय कसरत -

यावेळी जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी ए. पी. खानापूरकर यांनी मार्गदर्शन केले. जी. आर. घुमे व एस. के. दवणे यांनी त्यांचे अनुभव कथन केले. विधा सल्लागार प्रयाग सोनकांबळे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. नांदेड चाईल्ड लाईनच्या समुपदेशक आशा सूर्यवंशी यांनी गाईडलाईन १०९८ विषयी माहिती दिली. सदस्य जयश्री दुधाटे यांनी चाईल्ड लाईन से दोस्ती या कार्यक्रमात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. अश्विनी गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.

loading image