नांदेड : भोकरला पाऊस, गारपीट

आठवडे बाजारातील व्यावसायिकांसह ग्राहकांची तारांबळ
Nanded climate change Bhokar heavy rain
Nanded climate change Bhokar heavy rainsakal

भोकर : भोकर शहरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. परिसरात गत आठवड्यापासून वातावरणात बदल झाला असून अधूनमधून वादळासह पाऊस सुरू आहे. उकाडा मात्र कायम आहे. आता रोहिणी नक्षत्र सुरु झाले असून शेतकरी खरीप हंगामातील कामाला लागले आहेत.

बी-बियाणे व अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. आज शहरात आठवडे बाजार असल्याने मोठी गर्दी होती. त्यातच वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाल्याने बाजारातील व्यावसायिकांसह ग्राहकांची तारांबळ उडाली.

किल्लेधारूरमध्ये पाऊस

किल्लेधारूर (जि. बीड) शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुपारी साडेचारच्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस झाला. नंतर मात्र प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com