
नांदेड : जांभळा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; तामसा नदीला पूर
तामसा : जांभळा (ता. हदगाव) परिसरात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे परिसरातील नदी-नाले भरभरून वाहून अनेक शेतातील पेरलेली सोयाबीन बियाणे पुराच्या तडाख्यात वाहून गेल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या परिसरातील नदी-नाले तामसा नदीला मिसळत असल्याने जांभळा परिसरात पाऊस तर तामसा नदीला पूर असे चित्र संध्याकाळी बघायला मिळाले.
पावसामुळे जांभळा गावाच्या पुलावरून तीन ते चार फूट पुराचे पाणी वाहल्याने पैलतीराकडील डाक्याचीवाडी, शेंदन, या गावाकडे जाणाऱ्या संपर्क दोन तास तुटला होता. परिणामी तामसा येथील आठवडी बाजारातून खरेदी करून या परिसरात जाणाऱ्या नागरिकांची मोठी परेशानी वाहतूक खोळंबल्याने बघायला मिळाले.
जांभळा गावातील अनेक घरात पुराचे पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. गावात सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने अडकलेल्या अनेक वाहनांना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मोठी कसरत केली. या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुराचे पाणी अनेक शेतात घुसून शेत जमीन खरडन्याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. तामसा नदीवरील पुलाचे बांधकाम झाले नसल्याने पुराचे पाणी पर्यायी कच्च्या पुलावरून चार फूट वाहत असल्याने संध्याकाळी तामसा-भोकर वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे अनेक वाहनधारकांना व प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत तामसा पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून बसावे लागले होते.
Web Title: Nanded Cloudy Heavy Rain Tamsa River Flood Agriculture Soybean Seeds Loss
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..