नांदेड : विरोधी संचालकांच्या तगाद्याने अखेर सहकारी पतपेढीचे लाभांश धनादेश बँकेत जमा

प्रल्हाद कांबळे | Wednesday, 30 December 2020

यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाद देत  शासनाने संचालक मंडळास लाभांश वाटपाचे अधिकार दिले होते त्यानुसार १० डिसेंबरपूर्वी संचालक मंडळ सभा घेवून लाभांश वाटप करण्यात येईल असे अश्वासन नोव्हेंबर महिन्याच्या सभेत दिले होते.

नांदेड-  सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेडच्या सभासदांची प्रतिक्षा संपली असून विरोधी संचालकांच्या पाठपूराव्यामुळे अखेर लाभांश वाटपाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून त्याबाबतच्या रक्कमेचा धनादेश स्टेट बँकेत पतसंस्थेच्या वतीने आज जमा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे आर्थिक वर्षाचे लाभांश वार्षिक सभेनंतर वाटप करण्यात येते.

यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाद देत  शासनाने संचालक मंडळास लाभांश वाटपाचे अधिकार दिले होते त्यानुसार १० डिसेंबरपूर्वी संचालक मंडळ सभा घेवून लाभांश वाटप करण्यात येईल असे अश्वासन नोव्हेंबर महिन्याच्या सभेत दिले होते.

परंतु सत्ताधारी मंडळीकडून याबाबत टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामूळे सभासदांतून प्रचंड असंतोष पसरला होता.  पदाधिकार्यांनां सभासदांच्या प्रंचंड रोषास सामोरे जावे लागले होते. याबाबत सभासदांच्या भावनांना वाट मोकळी करून देत पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत मेकाले, प्रल्हाद राठोड यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

Advertising
Advertising

त्यास विजय पल्लेवाड, बाबूराव कैलाशे, सूमन डांगे यांनी समर्थन देताच पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी २० डिसेंबर रोजी विशेष बैठकीचे आयोजन करून  ४.२५% लाभांश वाटपास मंजूरी दिली. सदर ठरावास संचालक शंकर इंगळे, चंद्रकांत दामेकर, प्रत्हाद राठोड, चंद्रकांत मेकाले यांनी पतसंस्थेच्या सभासदांना ५% लाभांश देण्याची आग्रही मागणी लावून धरली परंतू सताधारी मंडळीनी येथेही आपला दळभद्रीपणा दाखवत सभासदांना केवळ ४.२५% लाभांश वाटपाचा ठाराव बहुमताच्या जोरावर पारीत करून घेतला.

महाराष्ट्र शासनाच्या नोव्हेंबर 2020 च्या शासननिर्णया प्रमाणे संचालक मंडळाच्या मासिक सभेत ठराव घेऊन या वर्षीचा सण 2019- 20 या आर्थिक वर्षासाठीचा लाभांश 4.25 % याप्रमाणे पतसंस्थेच्या चार हजार पाचशे चौदा सभासदांच्या खात्यावर जमा करण्यासाठीचा धनादेश आज पतसंस्थेकडून बँकेस सादर करण्यात आला. सभासदांच्या खात्यात सदर लाभांशाची रक्कम जमा करण्यात सुरुवात झाल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगीतले. विद्यमान संचालक मंडळाने मागील पाच वर्षापासून विविध योजनांचा सपाटा लावला असला तरी पाच हजार ५१४ एवढी मोठी सभासद संख्या असूनही पतसंस्थेचे  पतसंस्थे भागभांडवल कसेबसे ३० कोटीच्या आसपासच रेंगाळले असल्याचे दिसून येते. आजघडीला मागेल त्याला कर्ज वाटप ही शुद्धथाप असल्याचा आरोप सभासदांतून केल्या जात आहे.

दरम्यान या लाभांश वाटपास विलंब होत असल्या बाबतच्या निवेदनाची ईसकाळने दखल घेत ठळक प्रसिद्धी दिली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पदाधिकाऱ्यांना विरोधकांपूढे नमते घ्यायला लागून अखेर लाभांश वाटपाचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याचादावा संचालक चंद्रकांत मेकाले, प्रल्हाद राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.