
बुधवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालापैकी गुरुवारी ८५९ अहवाल प्राप्त झाले. यातील ८२७ निगेटिव्ह तर २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ९८४ इतकी झाली आहे.
नांदेड - कोरोना प्रतिबंधक लस नांदेडात दाखल झाली आहे. शनिवारपासून जिल्ह्यातील सहा सेंटरवर ही लस लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गुरुवारी (ता. १४) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर नव्याने २५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील ९४. ८५ टक्के झाले आहे. कोरोना आजारी रुग्णांचा मृत्यूदरात घट झाली आहे.
बुधवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालापैकी गुरुवारी ८५९ अहवाल प्राप्त झाले. यातील ८२७ निगेटिव्ह तर २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ९८४ इतकी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी गुरुवारी दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा ५७८ वर स्थिर आहे.
आतापर्यंत २० हजार ८५३ रुग्ण कोरोनामुक्त
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील - दोन, नांदेड महापालिकेंतर्गत एनआरआय भवन, गृहविलगीकरण कक्षातील - १८, जिल्हा शासकीय रुग्णालय- दोन, देगलूर - दोन, मुखेड- एक, बिलोली- एक, माहूर - सहा, हदगाव- दोन, नायगाव - दोन व खासगी रुग्णालय - चार असे ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २० हजार ८५३ रुग्ण कोरोनाचा उपचार घेऊन घरी परतले आहेत.
हेही वाचा- दस लाख रुपये दो, नही तो ठोक देंगे; नांदेडच्या बार मालकाला मागितली खंडणी, तिघांना पोलिस कोठडी
३५२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु
गुरुवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रातील - ११, किनवट - पाच, उमरखेड - एक, बिलोली - दोन, माहूर - एक, हदगाव - एक, मुदखेड - एक, नायगाव- एक आणि उमरी - दोन असे २५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २१ हजार ९८४ इतकी झाली असून, सध्या ३५२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १२ रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ३९८ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती.
नांदेड कोरोना मीटर
एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ९८४
एकूण बरे - २० हजार ८९५
एकूण मृत्यू - ५७८
गुरुवारी पॉझिटिव्ह - २५
गुरुवारी बरे - ४०
गुरुवारी मृत्यू - शून्य
गंभीर रुग्ण -१२
स्वॅब तपासणी सुरु - ३९८