नांदेडकरांना दिलासा! २४ तासांत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही

जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधित रुग्ण आजारातून मुक्त
corona updates
corona updatescorona updates

नांदेड: Nanded Corona Updates: जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या २ हजार १८ अहवालापैकी एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार १७९ एवढी झाली असून यातील ८७ हजार ४८२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ४२ रुग्ण उपचार घेत असून यात ३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. रविवारी जिल्ह्यातील पाच कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे.

यात पालिकेअंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील - पाच व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज ४२ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - तीन, किनवट -एक, देगलूर - दोन, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण- ३५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण एक व्यक्ती उपचार घेत आहेत.

corona updates
ग्रामीण भागाला दिलासा! आता मिळणार सीटी स्कॅन, MRI, डायलिसीस सुविधा

नांदेड कोरोना मीटर :
एकूण पॉझिटिव्ह: ९० हजार १७९
एकूण कोरोनामुक्त : ८७ हजार ४८२
एकूण मृत्यू संख्या : दोन हजार ६५५
रविवारी कोरोना पॉझिटिव्ह : शून्य
रविवारी कोरोनामुक्त : पाच
रविवारी मृत्यू : शून्य
उपचार सुरु : ४२
अतिगंभीर प्रकृती : तीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com