Corona Updates : नांदेडला आज सातजण कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

file photo
file photo

नांदेड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात (Corona In Nanded) एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील (Nanded) मृत्यूदर स्थिर होता. गुरुवारी (ता. पाच) प्राप्त झालेल्या एक हजार ९७२ अहवालापैकी एक हजार ९४४ निगेटिव्ह तर सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९० हजार २०२ एवढी झाली आहे. यातील ८७ हजार ५०४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर गंभीर असलेल्या रुग्णांपैकी एका बाधितांचा (Corona) मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला ४२ रुग्ण उपचार घेत असून तीन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. गुरुवारी झालेल्या एका बाधितांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५६ एवढी आहे. गुरुवारी जिल्ह्यातील सात कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी ४२ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी दोन, किनवट (Kinwat) दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात पाच, नांदेड महापालिकेंतर्गत अंतर्गत गृह विलगीकरणात ३३ व्यक्ती असे ४२ जण उपचार घेत आहेत.

file photo
PSI होण्याचे स्वप्न अधुरे, विद्यार्थ्याचा हृदयविकाराने निधन

नांदेड कोरोना मीटर

एकूण बाधित - ९० हजार २०२

एकूण बरे - ८७ हजार ५०४

एकूण मृत्यू - दोन हजार ६५६

गुरुवारी बाधित - सात

गुरुवारी बरे - सात

गुरुवारी मृत्यू - एक

उपचार सुरु - ४२

अतिगंभीर प्रकृती - तीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com