Corona Updates : नांदेडला आज केवळ सात जण कोरोनाबाधित

File photo
File photo

नांदेड : जिल्ह्यात (Corona Cases In Nanded) सोमवारी (ता.दोन) प्राप्त झालेल्या एक हजार ९६६ अहवालांपैकी सात अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ४४ रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार १८६ एवढी झाली असून यातील ८७ हजार ४८७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी (Government Medical College, Vishnupuri) येथे १३० तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे १४५ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

File photo
विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू, ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कार

नांदेड कोरोना मीटर

एकुण स्वॅब - ६ लाख ६३ हजार ६३५

एकुण निगेटिव्ह - ५ लाख ६१ हजार ४७०

एकुण बाधित - ९० हजार १८६

एकूण बरे - ८७ हजार ४८७

एकुण मृत्यू - २ हजार ६५५

आज प्रलंबित स्वॅब -३२

आजचे बाधित - सात

आजचे बरे - पाच

आजचे मृत्यू - शून्य

उपचार सुरू - ४४

अतिगंभीर प्रकृती- तीन

File photo
काँग्रेस सदस्यांची भाजपच्या पंचायत समिती उपसभापतींना मारहाण

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेऊन मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे.

- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com