दोन महिलांसह सहा आरोपींना सक्तमजुरी

प्रत्येकाला रोख १२ हजार रुपयांचा दंडही ठोठावला
nanded crime update Six accused two women sentence hard labor imprisonment
nanded crime update Six accused two women sentence hard labor imprisonmentSakal

नांदेड : आपल्या बहिणीला बोलण्यास प्रतिबंध केला म्हणून दोन महिलांसह सहा जणांनी एकाला मारहाण केली होती. त्याचा निकाल देतांना चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल. गायकवाड यांनी गुरुवारी (ता.३१) सहा आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकाला एकूण १२ हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अधिक माहिती अशी की, ता.नऊ फेब्रुवारी २०२० रोजी गणेशसिंह अमरसिंह ठाकूरने सुरज मनोहर खिराडे यास आपल्या बहिणीला न बोलण्याबदल समज दिली.

त्यानंतर १० फेब्रुवारी २०२० रोजी गणेशसिंह ठाकूर हा आपल्या पान शॉप दुकानाकडे जाण्यासाठी निघाला असता सुरज खिराडेने त्यास थांबवले. आणि शिव्या द्यायला सुरूवात केली. तेंव्हा दोन महिला आणि चार पुरूष असे पाच जण तेथे आले. या सर्वांनी लाकडाच्या दांड्याने गणेशसिंह ठाकूरला मारहाण केली. शिवाय त्याच्या महागड्या दुचाकीचेही (एमएच-२६, बीएल-६९०१) नुकसान केले. घटना गुरुनगर भागात घडली. त्यानंतर नागरिकांनी गणेशसिंह ठाकूरला विमानतळ पोलिस ठाण्यात नेले असता पोलिसांना त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. त्यानंतर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आरोपीच्या सदरात सुरज मनोहर खिराडे (२३), मंगेश मनोहर खिराडे (२५), देवराव वामनराव पाईकराव (४५), वंदना मनोहर खिराडे (४८), अनिता उर्फ मंदा अनिल आठवले (४०), बाबूराव वामनराव पाईकराव (४२) अशा सहा जणांची नावे होती.

याचा तपास तत्कालीन पोलिस उपअधिक्षक अभिजित तानाजी फस्के यांनी केला. या सर्व आरोपींना अटक करून सखोल तपास, अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर अभिजित फस्के यांनी सहा जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यादरम्यान विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक बाबा गजभारे, तुरेराव, कुरूळेकर, पोलिस अंमलदार पावडे, नागरगोजे यांनी पुढाकार घेतला. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार रामदास सुर्यवंशी यांनी काम बघितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com