नांदेड : कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, लोहा तालुक्यातील घटना

file photo
file photo

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना ता. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोलेगाव, तालुका लोहा येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील शेतकरी सचिन रामराव नाईकवाडे (वय ४०) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. लहरी निसर्गापुढे हतबल झालेल्या या शेतकऱ्याने आपला प्रपंच चालवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. यावर्षीही ही हातचा हंगाम गेल्याने बँकेचे कर्ज वाढत गेले. आता प्रपंच व कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत मागील काही दिवसापासून तो तणावात होता. अखेर त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेवटी ता. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या शेतात जाऊन (सचिन नाईकवाडे) विष प्राशन केले. यात तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अरुण दिगंबर नाईकवाडे यांच्या माहितीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास फौजदार श्री गीते करत आहेत.

मांडवी परिसरात साडेतीन हजाराची दारु जप्त 

काझीपेठ जावरला, तालुका किनवट येथे बेकायदेशीररीत्या व विना परवाना साडेतीन हजार रुपयांची देशी दारु चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेल्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन हजार ५०० रुपयाची देशी दारु जप्त केली. याप्रकरणी फौजदार जमाखान पठाण यांच्या फिर्यादीवरुन मांडवी पोलिस ठाण्यात दारु विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास श्री. अस्वले करत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com