नांदेड : देगलूर मतदारसंघात विकासकामांसाठी दहा कोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Deglaur Ten crore fund sanctioned for development works

नांदेड : देगलूर मतदारसंघात विकासकामांसाठी दहा कोटी मंजूर

देगलूर : निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सहकार्यातून देगलूर तालुक्यातील पाच जिल्हा परिषदेच्या गटातील ४८ गावातील ५२ कामासाठी जवळपास दहा कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. यातील काही कामे निविदेच्या प्रतिक्षेत असून तर काही कामांना निधी प्राप्त झाला असून येत्या काही दिवसात ही कामे पूर्णत्वास जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मतदारसंघातील आदमपूर, बडूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद या २६८ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी बारा कोटी तर खतगाव, कोटेकलुर, शहापूर, सुंडगी, देगलूर, कारेगाव रस्त्याच्या ४३ किलोमीटर सिमेंट रस्त्याच्यासाठी तीन कोटी ४३ लाख रुपये, देगलूर, सुडंगी हनुमान हिपरगा, सांगवी ते राज्य सीमा या ९० किलोमीटर रस्त्यासाठी तीन कोटी २६ लाख रुपये तसेच खतगाव, शहापूर या रस्त्यासाठी तीन कोटी तर कुमारपली, येडूर, मानुर ते गुंटूर रस्त्यासाठी दोन कोटी १५ लाख ४५ हजार रुपये तर आदमपूर, बिलोली, कुंडलवाडी येथील पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी ८८ लाख ५५ हजार रुपये, खतगाव, कोटेकल्लुर, शहापूर, सुडंगी, देगलूर या ४३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक कोटी ६६ लाख ८७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या सर्व कामांची निविदा निघालेली असून ती कामे येणाऱ्या काळात पूर्ण झाली तर तालुक्यातील अनेक गावातील दळणवळणाचा प्रश्न निकाली निघेल असा विश्वासही आमदारअंतापूरकर यांनी यावेळी व्यक्त केला. दलित वस्ती पंचवीस पंधरा व तांडा वस्तीतील कामांना प्राधान्याने सध्या निधी प्राप्त झाला आहे. तालुक्यातील जवळपास ६० पाणंद रस्त्यांची कामेही मंजूर झाली असून यासाठी २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. येत्या वर्षभराच्या आत मतदारसंघातील प्रत्येक गाव मुख्य रस्त्यांना जोडण्याचा माझा मानस असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

या गावांचा अंतर्भाव

करडखेड सर्कलमधील चाकूर, भोकसखेडा, भायेगाव, आचेगाव, कारेगाव, केदारकुंटा, वळग, बलुर, बळेगाव, हॉटेल काठेवाडी, खानापूर सर्कलमधील देगाव, मनसकरगा, अल्लापुर, वन्नाळी, हनुमान हिपरगा, खानापूर, तडखेल, मुजळगा, देगाव, आलापुर, चैनपुर, काटेकलुर, शहापूर सर्कलमधील मेदनकल्लूर, करेमलकापूर, नंदुर, कुरुडगी, तमलुर, शहापूर, शेळगाव, निपाणी सावरगाव, शेकापुर, शेवाळा, आल्लूर, मरखेल सर्कलमधील टाकळी जहांगीर, माळेगाव, बेंबरा, देवापुर, शिवणी, मरतोळी, हाळी, झरी, हाणेगाव आधी गावातील विविध विकासकामांचा यामध्ये अंतर्भाव असल्याचे आमदार अंतापूरकर यांनी सांगितले. उर्वरित गावांना येत्या काळात निधी देऊन तेथील कामे पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Nanded Deglaur Ten Crore Fund Sanctioned For Development Works

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top