esakal | नांदेड : शिक्षकांना वर्क फ्राॅम होमची मुभा देण्याची सीएमकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यात जीवनावश्यक सेवा सोडून इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे.

नांदेड : शिक्षकांना वर्क फ्राॅम होमची मुभा देण्याची सीएमकडे मागणी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत आहेत. आज देशातील 58% कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रामध्ये आढळत आहेत. त्यात नांदेड जिल्हासुध्दा मागे नाही. सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी चिन्ह आहेत. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत व मृत्यूसुद्धा वाढले आहेत. त्यात महाराष्ट्र शासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. 

यात जीवनावश्यक सेवा सोडून इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे.  तसेच एकीकडे पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. यात नुकताच जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांना 50% उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्र काढले आहे. सध्याच्या परिस्थितीत काही शिक्षकबांधव कोरोना कामी कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील जवळपास 10 ते 15 शिक्षक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. त्यात दररोज शाळेत बोलावणे या परिस्थितीत उचित ठरणार नाहीत. यात शाळेत मुले येणार नाहीत. मुलांना ऑनलाइन पध्दतीनेच अभ्यास देणे सुरु आहे. 

एप्रिल महिन्याचा शालेय पोषण आहार बहुतेक शाळेने वाटप केला आहे. शाळा सिद्धी ऑनलाइन पध्दतीने भरावयाचे आहे. यूडायस माहिती ऑनलाइन पद्धतीने भरता येईल, अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच शिक्षकांना शाळेत बोलवावे कारण शाळेत यायचे असल्यास स्वतंत्र वाहनाने येणे आवश्यक असणार आहे. इतर वाहनाने थोडे अवघड असणार आहे. काही शाळांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसते त्यात एकट्यासाठी वाहन सुरक्षित असेलच असे नाही. उन्हाची तीव्रता वाढत आहे. तसेच बहुतेक शिक्षकांचे नातेवाईक कोरोनाचा सामना करत आहेत. त्यामुळे सर्व परिस्थितीचा विचार करून सर्व शिक्षकांना वर्कफ्राॅम होमची मुभा शासनाने द्यावी, यासाठी शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संघटक रवी ढगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सचिव सचिन भालेराव, महिला प्रतिनिधी शुभांगी जाधव, मंगल जिगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

loading image